त्यांनी मला 'यमला पगला दीवाना'साठी विचारलं, पण मी नकार दिला; सचिन पिळगांवकरांनी सागितली धर्मेंद्र यांची आठवण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sachin Pilgaonkar Memory with Dharmendra: मराठीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत एक अत्यंत हृदयस्पर्शी किस्सा सांगितला, ज्यातून धर्मेंद्र यांचा अत्यंत नम्र आणि साधा स्वभाव समोर आला आहे.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतील एका पर्वाचा अंत झाला. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत एक अत्यंत हृदयस्पर्शी किस्सा सांगितला, ज्यातून धर्मेंद्र यांचा अत्यंत नम्र आणि साधा स्वभाव समोर आला आहे.
advertisement
2/8
सचिन पिळगांवकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत धर्मेंद्र यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सचिन यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत १९६७ मध्ये हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'मझली दीदी' मध्ये पहिल्यांदा काम केले. त्यावेळी सचिन यांचे वय केवळ नऊ वर्षे होते.
advertisement
3/8
'मझली दीदी' मध्ये धर्मेंद्र यांनी मीना कुमारी यांच्या पतीची, तर सचिनने त्यांच्या धाकट्या भावाची भूमिका केली होती. सचिन सांगतात, "सेटवर हा देखणा माणूस केवळ सहकलाकारांशीच नव्हे, तर सेटवरील प्रत्येक तंत्रज्ञाशीही अत्यंत सौम्य आणि आदराने बोलत असे. ते सर्वात नम्र व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते."
advertisement
4/8
सचिन आणि धर्मेंद्र यांनी 'शोले', 'रेशम की डोरी', 'क्रोधी' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पुढे सचिन यांना 'आजमयिश' या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांना दिग्दर्शित करण्याचाही मान मिळाला. पण, धर्मेंद्र यांच्या मोठेपणाचा खरा अनुभव सचिन यांना 'यमला पगला दीवाना' या शिर्षकावरून आला.
advertisement
5/8
सचिन यांनी ९० च्या दशकाच्या उत्तरार्धातील किस्सा सांगितला. त्यांनी 'यमला पगला दीवाना' हे शिर्षक 'इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन' कडे नोंदवले होते. काही दिवसांनी एका निर्मात्याने सचिन यांना हे शिर्षक देण्यास विचारले, पण सचिन यांनी नकार दिला.
advertisement
6/8
त्यानंतर, खुद्द धर्मेंद्रजींचा फोन सचिन यांना आला. धर्मेंद्र यांनी विचारले, "सचिन, मला तुम्हाला काहीतरी विचारायचे होते... तुमच्याकडे 'यमला पगला दीवाना' हे चित्रपटाचे शिर्षक आहे." धर्मेंद्र यांच्या प्रश्नावर सचिन पिळगांवकरांनी आदराने क्षणाचाही विलंब न करता मोठेपणा दाखवला.
advertisement
7/8
सचिन म्हणाले, "नाही, ते आता माझ्याकडे नाही! ते शिर्षक फक्त तोपर्यंत माझे होते, जोपर्यंत तुम्ही ते मागितले नव्हते. आता ते माझे राहिले नाही, ते तुमचे आहे!"
advertisement
8/8
सचिन पुढे म्हणाले की, "ज्या माणसाने भारतीय चित्रपटसृष्टीला इतके काही दिले आहे, त्यांची परतफेड आपण कशी करणार? त्यांचा वारसा नेहमीच सर्वोच्च राहील." धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सचिन पिळगांवकरांनी सांगितलेला हा किस्सा, त्यांच्या साधेपणाची आणि मोठेपणाची साक्ष देतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
त्यांनी मला 'यमला पगला दीवाना'साठी विचारलं, पण मी नकार दिला; सचिन पिळगांवकरांनी सागितली धर्मेंद्र यांची आठवण