TRENDING:

वृत्तनिवेदिका ते फुलराणी! मराठी नाट्यसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा 22 वर्षांपूर्वी झाला होता दुर्देवी अंत

Last Updated:
ती फुलराणी म्हटलं की आपसुकच एक नाव एक चेहरा डोळ्यांसमोर येऊन उभा राहतो तो म्हणजे अभिनेत्री भक्ती बर्वे. आपल्या कसदार अभिनयानं आणि शब्द फेकींनं भक्ती बर्वे यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. केवळ मराठीच नाही हिंदी आणि गुजराती भाषेतही भक्ती बर्वे यांनी काम केलं. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीनं फार लवकर या जगाचा निरोप घेतला. भक्ती बर्वे यांची आज 75वी पुण्यतिथी आहे. यानिमित्तानं त्यांच्याविषयी काही रंजक गोष्टी आणि त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला पाहूयात.
advertisement
1/7
ती फुलराणी! नाट्यसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा 22 वर्षांपूर्वी झाला दुर्देवी अंत
पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेलं ती फुलराणी हे नाटक अभिनेत्री भक्ती बर्वे यांनी अजरामर केलं. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाची भरलाय घडा. हे वाक्य आजही प्रसिद्ध आहे. भक्ती बर्वे यांनी ती फुलराणी नाटकाचे 1111 हून अधिक प्रयोग केले.
advertisement
2/7
त्याचप्राणे आई रिटायर होतेय हे त्यांचं नाटकंही कमालीचं गाजलं. त्यात त्यांनी साकारलेली आईची भुमिके प्रेक्षकांना आवडली. या नाटकाचे देखील त्यांनी 950हून अधिक प्रयोग केले. भक्ती बर्वे यांच्यानंतर अभिनेत्री स्मिता जयकर यांनी ती फुलराणी हे नाटक पुढे नेलं. त्यानाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
advertisement
3/7
भक्ती बर्वे बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करत होत्या. बालपणी गणेशोत्सवात छोट्या नकला करण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास मनोरंजन क्षेत्रात एक अभिनेत्री पर्यंत येऊन पोहोचला. शाळेतही भक्ती बर्वे हुशार होत्या. त्यांचं पाठांतर उत्तम होतं. त्यामुळे पुढे जाऊन त्यांना आकाशवाणी आणि त्यानंतर दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 30हून अधिक नाटकं आणि 4-5 सिनेमात काम केलं.
advertisement
4/7
भक्ती बर्वे यांची सगळी नाटकं ही सुपरहिट ठरली. त्यांच्या नाट्यक्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना 1990 साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
advertisement
5/7
अखेरचा सवाल, टिळक आणि आगरकर, ती फुलराणी, मिठीतून मुठीत, रंग माझा वेगळा, रातराणी, वयं मोठं खोटम् इ. नाटकात त्यांनी काम केलं.
advertisement
6/7
सिने आणि नाट्यसृष्टीत काम करत असताना भक्ती बर्वे यांची ओळख हिंदी सिनेमातील आघाडीचे अभिनेते शफी इनामदार यांच्याशी झाली. दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं पुढे त्यांनी लग्न केलं. 1996साली शफी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
advertisement
7/7
नवऱ्याच्या मृत्यूनंतर जवळपास 5 वर्षांनी भक्ती बर्वे यांचं वाईहून मुंबईला येत असताना रस्ते अपघातात निधन झालं. 12 फेब्रुवारी 2001 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्यानंतर आजवर कोणीच त्यांची जागा घेऊ शकलेलं नाही. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी आजही तशीच आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वृत्तनिवेदिका ते फुलराणी! मराठी नाट्यसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा 22 वर्षांपूर्वी झाला होता दुर्देवी अंत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल