TRENDING:

'मला बेशुद्ध करून...' अवघ्या 16 व्या वर्षी अभिनेत्रीसोबत घडला भयानक प्रकार, रस्त्यावर काढली रात्र

Last Updated:
Bollywood Casting Couch : नुकतंच एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने तिच्यासोबत १६ व्या वर्षी घडलेल्या एका अत्यंत भयानक घटनेबद्दल सांगितलं आहे.
advertisement
1/9
'मला बेशुद्ध करून...' अवघ्या 16 व्या वर्षी अभिनेत्रीसोबत घडला भयानक प्रकार
मुंबई: बॉलिवूडच्या ग्लॅमरमागे अनेकदा एक भयाण वास्तव दडलेलं असतं. अनेक कलाकार याबद्दल उघडपणे बोलतात. यातीलच एक धक्कादायक बाजू म्हणजे कास्टिंग काऊच.
advertisement
2/9
नुकतंच एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने तिच्यासोबत १६ व्या वर्षी घडलेल्या एका अत्यंत भयानक घटनेबद्दल सांगितलं आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून, लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई आहे.
advertisement
3/9
रश्मी देसाईने तिच्या दोन दशकांच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. पण तिच्या आयुष्यातला सर्वात कटू अनुभव तिने सांगितला.
advertisement
4/9
एका मुलाखतीत रश्मीने खुलासा केला की, वयाच्या १६ व्या वर्षी तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. एका ऑडिशनसाठी बोलावल्यानंतर एका व्यक्तीने तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
5/9
रश्मीने सांगितलं, "मी अडीच तासांनंतर कशीबशी त्या परिस्थितीतून बाहेर पडले आणि घरी जाऊन लगेच माझ्या आईला सर्व काही सांगितलं." दुसऱ्या दिवशी रश्मी आणि तिची आई त्या व्यक्तीला भेटायला गेल्या.
advertisement
6/9
रश्मीच्या आईने त्याला जोरदार कानाखाली मारली आणि निक्षून सांगितलं, "जर पुन्हा माझ्या मुलीसोबत असं काही करायची हिंमत केलीस, तर ही फक्त सुरुवात आहे!" रश्मीच्या आईच्या धाडसामुळे रश्मी त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकली.
advertisement
7/9
रश्मीने सांगितलं की, कास्टिंग काऊच ही एक वाईट गोष्ट आहे. ती म्हणाली, "प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये चांगले आणि वाईट लोक असतात. पण मी खूप नशीबवान आहे की, त्यानंतर मला काही चांगल्या लोकांसोबत काम करायची संधी मिळाली, आणि त्यांच्यासोबतचा माझा अनुभव खूप चांगला राहिला."
advertisement
8/9
एकेकाळी करोडो रुपयांच्या कर्जात बुडलेली आणि रस्त्यावर रात्र काढावी लागलेल्या रश्मी देसाईने आपल्या मेहनतीने पुन्हा यश मिळवलं. पण तिच्या आयुष्यात घडलेला हा धक्कादायक प्रसंग तिला आजही आठवतो.
advertisement
9/9
रश्मीने तिच्या करिअरची सुरुवात भोजपुरी चित्रपटांमधून केली. त्यानंतर 'उतरन' आणि 'दिल से दिल तक' यांसारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. तिने 'बिग बॉस १३' आणि इतर अनेक रिॲलिटी शोमध्ये देखील भाग घेतला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मला बेशुद्ध करून...' अवघ्या 16 व्या वर्षी अभिनेत्रीसोबत घडला भयानक प्रकार, रस्त्यावर काढली रात्र
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल