सावधान! डोळा फडफडणं फक्त योगायोग की भविष्याचे संकेत? 'हा' डोळा फडफडल्याने येत संकट
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आपल्याकडे डोळा लवणे किंवा डोळा फडकणे ही अतिशय सामान्य गोष्ट मानली जाते. विज्ञानाच्या मते, डोळा फडकणे हे थकवा, ताण किंवा डोळ्यांवरील ताणामुळे होते. मात्र, भारतीय 'समुद्र शास्त्रा'नुसार, डोळ्यांचे लवणे हे भविष्यात घडणाऱ्या शुभ किंवा अशुभ घटनांचे संकेत देतात.
advertisement
1/7

आपल्याकडे डोळा लवणे किंवा डोळा फडकणे ही अतिशय सामान्य गोष्ट मानली जाते. विज्ञानाच्या मते, डोळा फडकणे हे थकवा, ताण किंवा डोळ्यांवरील ताणामुळे होते. मात्र, भारतीय 'समुद्र शास्त्रा'नुसार, डोळ्यांचे लवणे हे भविष्यात घडणाऱ्या शुभ किंवा अशुभ घटनांचे संकेत देतात. पुरुषांचा आणि स्त्रियांचा कोणता डोळा लवतो, यावरून त्याचे अर्थ बदलतात. समुद्र शास्त्रानुसार डोळा फडफडणे हे अनेक प्रकारचे संकेत देतात.
advertisement
2/7
पुरुषांचा उजवा डोळा लवणे: समुद्र शास्त्रानुसार, पुरुषांचा उजवा डोळा लवणे अत्यंत शुभ मानले जाते. हा संकेत आहे की तुम्हाला लवकरच एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे किंवा तुमच्या मनात असलेल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. हे पदोन्नती किंवा धनलाभाचे लक्षण असू शकते.
advertisement
3/7
स्त्रियांचा डावा डोळा लवणे: स्त्रियांसाठी डावा डोळा लवणे हे भाग्योदयाचे लक्षण मानले जाते. जर एखाद्या स्त्रीचा डावा डोळा वारंवार लव लव करत असेल, तर तिला लवकरच सोन्या-चांदीचे दागिने किंवा एखादी मोठी भेटवस्तू मिळण्याचे योग असतात.
advertisement
4/7
पुरुषांचा डावा डोळा लवणे: पुरुषांसाठी डावा डोळा लवणे अशुभ मानले जाते. हा भविष्यातील संकटाचा किंवा शत्रूशी होणाऱ्या वादाचा संकेत असू शकतो. अशा वेळी कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर कोणाशीही बोलताना संयम राखणे आवश्यक आहे.
advertisement
5/7
स्त्रियांचा उजवा डोळा लवणे: स्त्रियांसाठी उजवा डोळा लवणे फारसे चांगले मानले जात नाही. हे एखाद्या कामात अडथळा येण्याचे किंवा आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या उद्भवण्याचे लक्षण असू शकते. अशा वेळी सावध राहणे गरजेचे असते.
advertisement
6/7
दोन्ही डोळे एकत्र लवणे: जर कोणाचे दोन्ही डोळे एकाच वेळी लवू लागले, तर याचा अर्थ असा की तुमची एखाद्या जुन्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी भेट होणार आहे. स्त्री असो वा पुरुष, दोघांसाठी हा संकेत समान फलदायी मानला जातो.
advertisement
7/7
वैज्ञानिक दृष्टिकोन: समुद्र शास्त्र जरी संकेत सांगत असले, तरी विज्ञानानुसार सतत डोळा फडकणे हे शरीरात मॅग्नेशियमची कमतरता, अपुरी झोप किंवा डोळ्यांवरील कोरडेपणामुळे होऊ शकते. जर तुमचा डोळा अनेक दिवसांपासून सतत फडकतोय, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
सावधान! डोळा फडफडणं फक्त योगायोग की भविष्याचे संकेत? 'हा' डोळा फडफडल्याने येत संकट