जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर या योजनेची सुरुवात होणार आहे. यासाठी गुजरातमधील एसएमपी मोबिटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. नागरिकांची वाहने महापालिकेचे माजी सैनिक आणि कंत्राटदाराचे कर्मचारी उचलून नेतात. ती सोडवण्यासाठी गरवारे स्टेडियम किंवा बाबा पेट्रोल पंप चौकात जावे लागते. दुचाकीसाठी 500 रुपये, चारचाकीसाठी 2 हजार रुपये दंड भरावा लागतो. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे.
advertisement
यामुळेच महानगरपालिकेने हे ॲप तयार केले आहे. या ॲपमुळे आता नागरिकांना पार्किंगसाठी जागा शोधणे सोपे जाणार आहे. त्यासोबतच गाडी उचलण्याची भीती देखील नागरिकांमध्ये राहणार नाही आहे. ॲपद्वारे मार्केट परिसरात पार्किंगची जागा बुक करता येईल. दुचाकीसाठी 10 रुपये, तीनचाकीसाठी 15 रुपये आणि चारचाकीसाठी 20 रुपये प्रति तास दर आकारले जातील.
हे जे ॲप आम्ही सुरू केलेले आहे, या ॲपमुळे सर्वसामान्य जनतेला खूप फायदा होणार आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की आपण देखील या ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा. जेणेकरून आपल्या शहरामध्ये वाहतुकीची समस्या ही सोडवण्यासाठी आम्हाला मदत होईल आणि नक्कीच हे ॲप सर्वांसाठी फायदेशीर ठरेल, असे महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत म्हणाले आहेत.





