Smart TVचं हे फीचर आहे जबरदस्त! 99 टक्के लोकांना माहितीच, होतो फायदा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
बदलत्या काळात आपल्या घरातील टीव्हीही आता स्मार्ट झाले आहेत. स्मार्ट टीव्हीच्या एका फीचरविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. ज्याविषीय 99 टक्के लोकांना माहितीच नाही.
advertisement
1/7

आपल्या सर्वांच्या घरात टीव्ही हा असतो. सध्याच्या काळात स्मार्ट टीव्ही आले आहेत. यावर आपण जास्तीत जास्त वेब सीरीज, मूव्हीजकिंवा टीव्ही शोज पाहतो. पण हा त्याचा प्रायमरी यूज आहे, पण एकमेवर यूज नाही. खरंतर स्मार्ट टीव्हीमध्ये HDMI पोर्ट्स लावलेले असतात. प्रत्येक टीव्हीमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त असे पोर्ट असतात.
advertisement
2/7
या पोर्टच्या माध्यमातून अनेक डिव्हायसेसला स्मार्ट टीव्हीने कनेक्ट करता येते. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टटीव्हीला अनके वेगवेगळ्या कामांसाठी वापरु शकता. आज आपण जाणून घेऊया की, HDMI पोर्ट कसे जबरदस्त काम करु शकते. एकाच पोर्टवर अनेक डिव्हाइस जोडता येतात. कसे पाहूया...
advertisement
3/7
गेम कन्सोल - तुम्ही HDMI पोर्टद्वारे तुमच्या स्मार्ट टीव्हीला गेम कन्सोल कनेक्ट करू शकता. अशा प्रकारे, तुम्ही गेमिंग स्टेशनवर न जाता घरी प्लेस्टेशन आणि Xbox Series X चा आनंद घेऊ शकता. तुमचा घरातील टीव्ही 120Hz रिफ्रेश रेटवर 4K गेमिंग ऑफर करेल.
advertisement
4/7
लॅपटॉप आणि स्मार्टफोन - HDMI पोर्टच्या माध्यमातून लॅपटॉपला स्मार्ट टीव्हीने कनेक्ट केलं जाऊ शकतं. अशा प्रकारे स्मार्ट टीव्ही तुमच्या सेकेंडरी डिस्प्ले म्हणून काम करेल. तुम्हाला प्रेझेंटेशन, गेमिंग किंवा दुसऱ्या कामासाठी लॅपटॉपची स्क्रिन लहान वाटत असेल तर स्मार्ट टीव्ही तुमच्या कामी येऊ शकते. अशा प्रकारे तुम्ही स्मार्टफोनचा कंटेंटही मोठ्या स्क्रीनवर पाहू शकता.
advertisement
5/7
साउंडबार - आधुनिक साउंडबारमध्ये आता HDMI ARC सपोर्ट आहे. यामुळे एकाच HDMI केबलद्वारे टू-वे कम्यूनिकेशन शक्य होतो. याचा अर्थ असा की आता तुम्हाला जास्त वायरिंगच्या त्रासाशिवाय उत्कृष्ट ऑडिओ क्वालिटी मिळू शकते.
advertisement
6/7
स्ट्रीमिंग डिव्हाइस - सध्या बाजारात अनेक स्ट्रीमिंग डिव्हायसेस उपलब्ध आहेत. त्यांना केवळ HDMI पोर्टमध्ये प्लग-इन करावं लागेल. प्लग-इन होताच तुम्हाला जुन्या टीव्हीमध्ये रिस्पॉन्सिव्ह आणि फास्टर इंटरफेस मिळते. ज्यावर तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही अॅप सिलेक्ट करु शकता.
advertisement
7/7
पाळत ठेवणारे कॅमेरे - आजकाल बहुतेक नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर आणि डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर HDMI आउटपुटसह येतात. याचा अर्थ तुम्ही तुमचा स्मार्ट टीव्ही HDMI पोर्टशी कनेक्ट करू शकता आणि CCTV कॅमेऱ्यांद्वारे आरामात तुमचे घर, ऑफिस आणि बागेचे निरीक्षण करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Smart TVचं हे फीचर आहे जबरदस्त! 99 टक्के लोकांना माहितीच, होतो फायदा