TRENDING:

No Railway : भारतातील एकमेव राज्य जिथे आजही रेल्वे जात नाही; मग इथे कसं पोहोचतात लोक? आश्चर्यचकीत करेल कारण

Last Updated:
भारतीय रेल्वेच्या नकाशावर सिक्किम हे एकमेव राज्य आहे जे आजही रेल्वे कनेक्टिव्हिटीपासून दूर आहे. पण हे राज्य रेल्वेच्या नकाशावर का नाही? आणि तिथपर्यंत पोहोचायचं कसं? याबद्दलची रंजक माहिती आज आपण घेणार आहोत.
advertisement
1/10
No Railway : भारतातील एकमेव राज्य जिथे आजही रेल्वे जात नाही; मग इथे कसं पोहोचतात लोक? आश्चर्यचकीत करेल कारण
आपल्यापैकी प्रत्येकासाठी रेल्वेचा प्रवास हा केवळ एक प्रवास नसून आठवणींचा साठा असतो. खिडकीतून दिसणारी शेतं, प्लॅटफॉर्मवरचा चहा आणि लांब पल्ल्याच्या प्रवासाची ती मजा काही औरच! भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक आहे, जे वाळवंट, डोंगर आणि दऱ्यांमधून मार्ग काढत देशाचा कानाकोपरा जोडते. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या भारतात आजही एक असं राज्य आहे, जिथे रेल्वेचं इंजिन पोहोचलेलं नाही. हो, हे राज्य म्हणजे हिमालयाच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य सिक्किम
advertisement
2/10
भारतीय रेल्वेच्या नकाशावर सिक्किम हे एकमेव राज्य आहे जे आजही रेल्वे कनेक्टिव्हिटीपासून दूर आहे. पण हे राज्य रेल्वेच्या नकाशावर का नाही? आणि तिथपर्यंत पोहोचायचं कसं? याबद्दलची रंजक माहिती आज आपण घेणार आहोत.
advertisement
3/10
सिक्किममध्ये रेल्वे नसल्याचं मुख्य कारण म्हणजे तिथली आव्हानात्मक भौगोलिक परिस्थिती. उंच डोंगररांगा, खोल दऱ्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेला हा प्रदेश आहे. अशा ठिकाणी रेल्वे मार्ग तयार करणं म्हणजे निसर्गाशी दोन हात करण्यासारखं आहे. डोंगर पोखरून बोगदे तयार करणं आणि तीस्ता नदीच्या खोऱ्यात पूल बांधणं हे अभियांत्रिकी दृष्टिकोनातून अत्यंत कठीण काम आहे.
advertisement
4/10
yeola businessman self-inflicted death unknown reason police investigation see nashik latest news
advertisement
5/10
सिक्किमचा प्रवास कसा कराल? (3 सोपे मार्ग)जरी रेल्वे थेट सिक्कमला जात नसली, तरी तिथे पोहोचणं कठीण नक्कीच नाही. पर्यटकांसाठी खालील तीन पर्याय उपलब्ध आहेत:
advertisement
6/10
1. रेल्वे आणि रस्ते प्रवास (सर्वात लोकप्रिय पर्याय):तुम्ही दिल्ली किंवा कोलकाता येथून रेल्वेने न्यू जलपाईगुडी (NJP) स्थानकापर्यंत येऊ शकता. हे सिक्कमच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. तिथून पुढे सिलीगुडी मार्गे शेअर जीप, टॅक्सी किंवा बसने 4 ते 5 तासांत तुम्ही गंगटोकला पोहोचू शकता. हा प्रवास तीस्ता नदीच्या सोबतीने होतो, जो अत्यंत सुखद आहे.
advertisement
7/10
2. विमानाने प्रवास:सिक्कममध्ये पाक्योंग (Pakyong) नावाचे विमानतळ आहे, जे गंगटोकपासून 30 किमी अंतरावर आहे. मात्र, तिथली विमानसेवा हवामानावर अवलंबून असते. त्याऐवजी पश्चिम बंगालमधील बागडोगरा विमानतळावर उतरणे हा अधिक चांगला पर्याय आहे. तिथून रस्ते मार्गाने तुम्ही सिक्कमला सहज जाऊ शकता.
advertisement
8/10
3. रॅाड ट्रिप :जर तुम्हाला ड्रायव्हिंगची आवड असेल, तर सिलीगुडीपासून सुरू होणारा डोंगरदऱ्यांचा प्रवास तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. मैदानी प्रदेशातून हळूहळू डोंगराळ भागात होणारा हा बदल बाईकर्स आणि रोड ट्रिप प्रेमींसाठी स्वर्गच आहे.
advertisement
9/10
रेल्वे नसल्यानेच टिकून आहे 'रिमोटनेस'अनेक पर्यटकांच्या मते, रेल्वे थेट पोहोचत नसल्यामुळेच सिक्कमचं निसर्गसौंदर्य आणि तिथली शांतता अजूनही टिकून आहे. सिक्कमला जाणं म्हणजे केवळ एका ठिकाणापर्यंत पोहोचणं नसून, पर्यावरणात, संस्कृतीत आणि आयुष्याच्या गतीत होणारा एक विलक्षण बदल अनुभवणं आहे. रेल्वे येत्या काही वर्षांत तिथे पोहोचेलच, पण सध्याचा रस्ते प्रवास हा या प्रवासाचा सर्वात अविभाज्य आणि सुंदर भाग आहे.
advertisement
10/10
सिक्किम हे जरी रेल्वे कनेक्टिव्हिटी नसलेलं एकमेव राज्य असलं, तरी पर्यटनासाठी ते कधीच मागे राहिलेलं नाही. तिथला निसर्ग आणि तिथली माणसं तुम्हाला या प्रवासाच्या प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे, या सुट्टीत तुम्हीही सिक्कमच्या या ऑफबीट प्रवासाचे नियोजन करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
No Railway : भारतातील एकमेव राज्य जिथे आजही रेल्वे जात नाही; मग इथे कसं पोहोचतात लोक? आश्चर्यचकीत करेल कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल