TRENDING:

होईल पैशांचा वर्षाव अन् मिळेल अपार वैभव, देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी धारण करा 'हे' खास रत्न!

Last Updated:
रत्नशास्त्रानुसार, विशिष्ट रत्ने केवळ सौंदर्यासाठी नसून ती ग्रहांची ऊर्जा खेचून घेणारी प्रभावी माध्यमे मानली जातात. काही रत्ने माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असून, ती योग्य विधीने धारण केल्यास आर्थिक अडथळे दूर होऊन आयुष्यात अपार वैभव आणि सुख-समृद्धी प्राप्त होऊ शकते.
advertisement
1/7

2/7
स्फटिक: स्फटिक हे रत्न माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. हे धारण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. ज्यांच्या उत्पन्नात स्थिरता नाही किंवा जे मानसिक तणावात आहेत, त्यांच्यासाठी स्फटिकाची माळ किंवा अंगठी अत्यंत फलदायी ठरते. यामुळे मन शांत राहते आणि धनाचा मार्ग मोकळा होतो.
advertisement
3/7
पुष्कराज: देवगुरू बृहस्पतीचे हे रत्न सुख, समृद्धी आणि भाग्योदयासाठी सर्वोत्तम मानले जाते. पुष्कराज धारण केल्याने व्यक्तीची निर्णयक्षमता वाढते आणि समाजात मान-सन्मान मिळतो. हे रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीला कधीही पैशांची कमतरता भासत नाही, अशी मान्यता आहे. विशेषतः धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी हे वरदान ठरते.
advertisement
4/7
पन्ना: बुधाचे हे रत्न व्यापार आणि उद्योगातील यशासाठी ओळखले जाते. ज्यांना व्यवसायात वारंवार नुकसान होत आहे, त्यांनी पन्ना धारण करावा. याला 'मनी स्टोन' असेही म्हणतात. हे बुद्धी तल्लख करते आणि योग्य वेळी योग्य आर्थिक निर्णय घेण्यास मदत करते, ज्यामुळे संपत्तीत वृद्धी होते.
advertisement
5/7
सिट्रीन: याला 'मर्चंट स्टोन' म्हटले जाते. हे रत्न पैशांना चुंबकासारखे खेचून घेते, असे मानले जाते. जर तुम्हाला पिवळा पुष्कराज घेणे शक्य नसेल, तर त्याचा पर्याय म्हणून 'सुनहला' धारण करू शकता. हे रत्न तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवल्याने बचतीमध्ये वाढ होते.
advertisement
6/7
जेड स्टोन: हिरव्या रंगाचे जेड रत्न सौभाग्य आणि प्रगतीचे प्रतीक आहे. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी किंवा ज्यांचे पैसे अडकले आहेत, त्यांच्यासाठी हे रत्न अत्यंत शुभ मानले जाते. हे एकाग्रता वाढवते आणि अनपेक्षित मार्गाने धनप्राप्ती करून देण्यास मदत करते.
advertisement
7/7
टायगर आय: हे रत्न धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तीला ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेले धैर्य मिळते. हे रत्न दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानले जाते. हे धारण केल्याने व्यक्तीची आर्थिक परिस्थिती लवकर सुधारू लागते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
होईल पैशांचा वर्षाव अन् मिळेल अपार वैभव, देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी धारण करा 'हे' खास रत्न!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल