TRENDING:

उन्हाळ्यात जेवणाला येईल रंगत, झणझणीत बनवा कांद्याची चटणी, एकदम सोपी रेसिपी

Last Updated:
रोज त्याच चवीचा कंटाळा येऊ लागल्यावर काहीतरी वेगळं, चटपटीत आणि तोंडाला पाणी सुटेल असं खाण्याची इच्छा होते. अशा वेळी ही झणझणीत कांद्याची चटणी तुमच्या जेवणात एक वेगळीच रंगत आणू शकते. 
advertisement
1/7
उन्हाळ्यात जेवणाला येईल रंगत, झणझणीत बनवा कांद्याची चटणी, एकदम सोपी रेसिपी
उन्हाळा सुरू होताच घराघरात कांद्याच्या पदार्थांची रेलचेल वाढते. विशेषतः कांद्याची सुकी भाजी हा अनेकांचा आवडता पर्याय असतो. मात्र रोज त्याच चवीचा कंटाळा येऊ लागल्यावर काहीतरी वेगळे, चटपटीत आणि तोंडाला पाणी सुटेल असे खाण्याची इच्छा होते.
advertisement
2/7
अशा वेळी ही झणझणीत कांद्याची चटणी तुमच्या जेवणात एक वेगळीच रंगत आणू शकते. ही चटणी केवळ चवीपुरतीच मर्यादित नाही, तर भूक वाढवण्याचेही काम करते. साध्या जेवणालाही ती खास बनवते.
advertisement
3/7
चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य : या चटणीसाठी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो प्रत्येकी एक वाटी, लसूण, कोथिंबीर, तेल, जिरे, मोहरी, बडीशेप, हळद, मीठ, धनेपूड आणि गूळ लागतो. यासोबतच 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या आणि थोडी चिंच आवश्यक आहे.
advertisement
4/7
चटणी बनवण्याची कृती : सुरुवातीला चिंच आणि लाल मिरच्या कोमट पाण्यात सुमारे 15 मिनिटे भिजत ठेवाव्यात. नंतर त्यांचे मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यावे.
advertisement
5/7
यानंतर कढईत तेल तापवून त्यात जिरे, मोहरी आणि बडीशेप घालून फोडणी तयार करावी. फोडणी तयार झाल्यावर त्यात चिरलेला कांदा घालून तो हलका सोनेरी होईपर्यंत परतावा. कांदा परतल्यानंतर त्यात टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवावे.
advertisement
6/7
त्यानंतर लसूण पेस्ट, मीठ, हळद आणि धनेपूड घालून मिश्रण चांगले एकजीव करावे आणि काही मिनिटे शिजू द्यावे. पुढे तयार केलेले चिच-मिरचीचे वाटण या मिश्रणात घालून नीट ढवळावे. त्यात गूळ घालून तो पूर्णपणे विरघळेपर्यंत चटणी शिजवावी. शेवटी कोथिंबीर टाकून हलक्या हाताने मिक्स करावे.
advertisement
7/7
सर्व्ह करण्याची पद्धत : अशी तयार झालेली ही तिखट आंबट-गोड चव असलेली कांद्याची चटणी भाकरी, पोळी किंवा साध्या वरण-भातासोबत खाल्ल्यास जेवणाची मजा दुप्पट करते. उन्हाळ्यातील साध्या जेवणालाही खास बनवायचे असेल, तर ही चटणी नक्की करून पाहा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन्हाळ्यात जेवणाला येईल रंगत, झणझणीत बनवा कांद्याची चटणी, एकदम सोपी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल