TRENDING:

रणवीर सिंगच्या Dhurandhar 2 ला शाहिद कपूरची टक्कर! OTT वर मोठा धमाका, या आठवड्यात काय रिलीज होणार?

Last Updated:
OTT Release: या आठवड्यात ओटीटीवर धमाकेदार फिल्म्स आणि सीरिज रिलीज होणार असून जर तुम्हाला 'धुरंधर'च्या तिकीट्स मिळत नसतील, तरीही तुमचा वीकेंड बोरिंग होणार नाही.
advertisement
1/10
रणवीर सिंगच्या Dhurandhar 2 ला शाहिद कपूरची टक्कर!
सध्या सोशल मीडियावर एकच नाव गाजतंय ते म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २'. रिलीजच्या अवघ्या पाच दिवसांतच या फिल्मने अशी कामगिरी करून दाखवली आहे, जी आजवर कोणत्याच बॉलिवूड फिल्मला करता आलेली नाही.
advertisement
2/10
या फिल्मची इतकी क्रेझ पाहायला मिळतेय की काही ठिकाणी थिएटर्स हाऊसफुल्ल झाले आहेत आणि प्रेक्षकांना फिल्मचं तिकीट मिळणंही कठीण झालंय. या परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी एक फक्कड प्लॅन तयार केला आहे.
advertisement
3/10
या आठवड्यात ओटीटीवर धमाकेदार फिल्म्स आणि सीरिज रिलीज होणार असून जर तुम्हाला धुरंधरच्या तिकीट्स मिळत नसतील, तरीही तुमचा वीकेंड बोरिंग होणार नाही. चला तर पाहुया, या आठवड्यात ओटीटीवर कोणते सिनेमे आणि सीरिज रिलीज होणार आहेत.
advertisement
4/10
डेअरडेव्हिल: बॉर्न अगेन सीझन २ (Daredevil Season 2) : तुम्हीही मार्वल फॅन आहात का? तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मार्वल कॉमिक्सचा सर्वात लोकप्रिय सुपरहिरो 'डेअरडेव्हिल' पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय.
advertisement
5/10
पहिल्या सीझनच्या तुफान यशानंतर 'डेअरडेव्हिल: बॉर्न अगेन' चा दुसरा सीझन २४ मार्च रोजी जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. ॲक्शन आणि थ्रिलरने भरलेली ही सीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरेल यात शंका नाही.
advertisement
6/10
समथिंग व्हेरी बॅड इज गोइंग टू हॅपन (Something Very Bad Is Going to Happen) : जर तुम्हाला हॉरर-थ्रिलर आवडत असेल, तर हॉलिवूडची लेडी सुपरस्टार कॅमिलो मोरोन स्टारर ही वेब सीरिज तुमच्यासाठी परफेक्ट आहे. नावाप्रमाणेच या सीरिजमध्ये काहीतरी भयंकर घडणार याची चाहूल प्रेक्षकांना लागली आहे. ही सीरिज २६ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
advertisement
7/10
हॅप्पी राज (Happy Raj) : या आठवड्यात थिएटरमध्ये रिलीज होणारा एकमेव मोठा दाक्षिणात्य चित्रपट म्हणजे 'हॅप्पी राज'. तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार जी.व्ही. प्रकाश कुमार आणि गौरी प्रिया यांची मुख्य भूमिका असलेला हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट २७ मार्च रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'धुरंधर २' च्या ॲक्शनला हा चित्रपट टक्कर देणार का, हे पाहावं लागेल.
advertisement
8/10
ओ रोमियो (O Romeo) : चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता शाहिद कपूरचा मल्टीस्टारर चित्रपट 'ओ रोमियो' ओटीटीवर एन्ट्री करणार आहे. हा चित्रपट २७ मार्च रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
advertisement
9/10
काट्टान (Kaattaan) : साऊथचा स्टार विजय सेतुपती या फिल्ममधून पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करायला सज्ज झाला आहे. त्याची बहुचर्चित क्राइम थ्रिलर वेब सीरिज 'काट्टान' या आठवड्यात ओटीटीवर येत आहे. २७ मार्च पासून तुम्ही ही सीरिज जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
advertisement
10/10
बीटीएस रिटर्न (BTS-Return) : कोरियन के-पॉप बँड 'BTS' च्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. नेटफ्लिक्स बीटीएसवर आधारित एक खास डॉक्युमेंट्री घेऊन येत आहे. तुम्हीही या बँडचे कट्टर चाहते असाल, तर या ग्रुपचा संघर्ष आणि यश जवळून पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. ही डॉक्युमेंट्री २७ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रणवीर सिंगच्या Dhurandhar 2 ला शाहिद कपूरची टक्कर! OTT वर मोठा धमाका, या आठवड्यात काय रिलीज होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल