TRENDING:

Summer Tips : महागडा एसी आणि हजारोंचं लाईट बिल वाचेल, 'या' ट्रिक्स तुमचं घर ठेवतील थंडाथंडा-कूलकूल!

Last Updated:
उन्हाळ्यात आपलं घर खूप तापतं. यामुळे बरेच लोक एसी वापरतात. पण एसी सर्वांनाच परवडतो असं नाही. शिवाय काही लोकांना तर एसीचा गारवा सहनही होत नाही. अशावेळी काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचं घर थंड ठेऊ शकता.
advertisement
1/9
महागडा एसी आणि हजारोंचं लाईट बिल वाचेल, 'या' ट्रिक्स तुमचं घर ठेवतील थंडाथंडा-कूलकूल!
उन्हाळ्याचा तडाखा आता चांगलाच वाढला आहे. त्यामुळे घराबाहरेच काय तर हल्ली घरात बसणंही अवघड झालंय. अशावेळी घर थंड ठेवण्यासाठी केवळ एसीच नाही तर आणखीही काही सोप्या पद्धती आहेत.
advertisement
2/9
सर्वात आधी तर घर थंड राहावं यासाठी घरात सूर्यप्रकाश येऊ देऊ नका. त्यासाठी घराचे दारं आणि खिडक्या यामधून थेट सूर्यप्रकाश येत नाही ना हे तपासा. घरात थेट सूर्यप्रकाश आला तर घर लवकर गरम होतं. म्हणून खिडक्यांवर हलक्या रंगाचे पडदे किंवा ब्लाइंड्स लावा. तुम्हाला जास्त ठिकाणी हे पडदे लावायचे नसतील तर ज्या ठिकाणी जास्त सूर्यप्रकाश येतो त्या ठिकाणी लावा. या पडद्यांमुळे सूर्याची उष्णता घरात येत नाही. तुमचं घर बऱ्यापैकी थंड राहतं.
advertisement
3/9
पडदे लावल्यानंतर घरात फार उष्णता राहत नाही तरीदेखील काही प्रमाणात घर तापतंच. या परिस्थितीत तुम्ही रात्रीच्या गार हवेचा वापर करू शकता. रात्रीच्या किंवा संध्याकाळच्यावेळी गार वारं वाहतं. तेव्हा घराचे दार खिडक्या उघडा आणि हे वार आत येऊ द्या. याने घर खूप अंशी थंड होईल. याला क्रॉस-व्हेंटिलेशनदेखील म्हणतात. यावेळी तुम्ही घरात पंखा चावू शकता. ज्याने घर कमी वेळात थंड होईल.
advertisement
4/9
उन्हाळ्यात पंखा वापरावा हे काही वेगळं सांगण्यासारखं नाही. पण तुम्ही सिलिंग फॅनसोबत टेबल फॅनचाही वापर केलात तर तुमचं घर थंड राहील. टेबल फॅन घरात अशा ठिकाणी ठेवा जिथून गार वारं येतं. तुम्ही तो खिडकीजवळही ठेऊ शकता. त्याचबरीबर तब्बल फॅन ठेवल्यानंतर त्यासमोर थंड पाणी किंवा फार्फाचे खडे ठेवा. यामुळे थंड हवा घरामध्ये पसरेल आणि घर लवकर थंड होईल.
advertisement
5/9
बरेच कपड्यांचे प्रकार उष्णता वर्धक असतात. उन्हाळ्यात असे कपडे घालणं आपण टाळतो. त्याचपरामाने घरातही जिथे जिथे कापड वापरलेलं असेल तिथेही असं उष्णतावर्धक कापड वापरू नका.
advertisement
6/9
घरातले पडदे, बेडशीट सोफा कव्हर हे सर्व सुती कापडापासून बनलेले असावे. कारण जड आणि कृत्रिम कापडांमुळे उन्हाळ्यात उष्णता वाढते. उन्हाळ्यात घरात सुती चादर, पडदे, सोफा कव्हर आणि उशीचे कव्हर निवडायामुळे घरात हवा खेळती राहाते.
advertisement
7/9
हा उपाय सर्वांना महित असेलच. जिथे झाडं असतात तिथे गारवा आणि आल्हाददायक वातावरण असतं. घरात तुम्ही छोटी छोटी रोपं लावल्यासही तुम्हाला हाच आनंद मिळू शकतो. घरात घरात भरपूर इनडोअर झाडे लावा. यामुळे घर छान तर दिसेलच सोबतच ते थंडही राहील. तुम्ही कोरफड आणि स्नेक हे प्लांट घरात ठेऊ शकता. ही रोपं बाल्कनी किंवा खिडकीजवळ लावल्यास ते हवा शुद्ध करतात तापमानही कमी करतात.
advertisement
8/9
बरेच लोक उन्हाळ्यात गारव्यासाठी अंथरुणावर पाणी शिंपडतात कारण पाण्याने घर बऱ्यापैकी थंड होऊ शकतं. म्हणून तुम्ही पाण्याचा इमारत वापर करून घर थंड ठेऊ शकता. यासाठी संध्याकाळी घरात फरशीवर थोडं पाणी शिंपडा किंवा पडदे थोडे ओले करा. जेव्हा हवा सुरु असते आणि त्या पाण्यापासून वाहते. तेव्हा सभोवतालचा भाग थंड हाऊस लागतो. पण पाण्याचा वापर कमी प्रमाणातच करा.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Tips : महागडा एसी आणि हजारोंचं लाईट बिल वाचेल, 'या' ट्रिक्स तुमचं घर ठेवतील थंडाथंडा-कूलकूल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल