Urmila Matondkar Birthday: डायरेक्टरसोबतच अफेअर पडलं महागात, मराठमोळ्या अभिनेत्रीने बरबाद केलं स्वतःचं आयुष्य, इंडस्ट्रीतून गायब
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून उर्मिलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. कायमच फॅशनमुळे चर्चेत राहणारी उर्मिला अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. आज रंगीला गर्लच्या वाढदिवसानिमित्त अनेक चाहते तिच्या जुन्या किस्स्यांबद्दल बोलताना दिसत आहेत. अभिनेत्रीला एक चूक महागात पडली असून त्या कारणामुळे तिला तिच्या करिअरला कायमचा रामराम करावा लागला.
advertisement
1/8

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून उर्मिलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. कायमच फॅशनमुळे चर्चेत राहणारी उर्मिला अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. आज रंगीला गर्लच्या वाढदिवसानिमित्त अनेक चाहते तिच्या जुन्या किस्स्यांबद्दल बोलताना दिसत आहेत. अभिनेत्रीला एक चूक महागात पडली असून त्या कारणामुळे तिला तिच्या करिअरला कायमचा रामराम करावा लागला.
advertisement
2/8
बालकलाकार म्हणून उर्मिलाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. उर्मिलाने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांची मने जिंकली. पण, अनेक वादातूनही ती चर्चेत राहिली. त्या वादामुळेच तिला चित्रपटांमध्ये काम मिळणं बंद झालं. उर्मिला बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींमध्ये येते, ज्यांनी कधीकाळी हिरोंपेक्षाही जास्त मानधन घेतले. मात्र नंतर ती संसारात व्यस्त झाल्यामुळे एकाएकी इंडस्ट्रीतून गायब झाली.
advertisement
3/8
आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या उर्मिला मातोंडकरने तिच्या फिल्मी करियरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. रामगोपाल वर्मा यांच्या ‘रंगीला’ चित्रपटातून उर्मिला मातोंडकरला खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. ‘रंगीला’ चित्रपटानंतर रामगोपाल वर्मा यांच्या अनेक चित्रपटांतून उर्मिला मातोंडकरने चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले. रामगोपाल यांच्या चित्रपटामुळे चर्चेत आलेली उर्मिला त्यांच्यासोबतच्या अफेअरमुळे प्रचंड चर्चेत आली.
advertisement
4/8
सत्या चित्रपटात राम गोपाल वर्मा यांनी उर्मिलासोबत पहिल्यांदा काम केले होते. त्यानंतर राम गोपालच्या प्रत्येक चित्रपटात उर्मिला दिसली. राम गोपाल त्यावेळी विवाहित असले तरी, दोघेही त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत होते. जेव्हा राम गोपालची पत्नी रत्ना यांना त्यांच्या अफेअरची बातमी कळाली. तेव्हा त्यांना धक्काच बसला आणि यावेळी रागाच्या भरात रत्नायांनी उर्मिलाच्या कानाशिलातच लगावली असल्याची बातमी मीडियामध्ये पसरली.
advertisement
5/8
उर्मिलासोबतच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर रामगोपाल वर्मा यांच्या पत्नीने त्यांच्यासोबत घटस्फोटही केला होता. त्यानंतर उर्मिला मातोंडकर आणि राम गोपाल वर्मा यांचं उर्मिलासोबतचं नातंही संपुष्टात आलं होतं. उर्मिला आणि राम गोपाल कधीच एकत्र आले नाहीत. त्यांच्या ह्या अफेअर्समुळे उर्मिलाच्या करियरची राख रांगोळी झाली होती. तेव्हापासून उर्मिला राम गोपाल वर्माच्या संपर्कात नाही. जेव्हा राम गोपाल वर्मा आणि उर्मिलामध्ये अंतर होते तेव्हा लोकांनी उर्मिलालाही काम देणे बंद केले होते. यानंतर उर्मिलाचे करिअर ठप्प झाले.
advertisement
6/8
उर्मिला आणि मोहसीन यांची भेट बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्यामुळे झाली. मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात त्यांची एकमेकांशी भेट झाली होती. तेव्हापासूनच ते एकमेकांना ओळखू लागले. पहिले मैत्री झाली, मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पहिल्याच भेटीमध्ये एकमेकांवर प्रेम जडल्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. भेटीगाठीनंतर मोहसीनने उर्मिलाला प्रपोज केलं. पण उर्मिलाला हे नातं मान्य नव्हतं. म्हणून तिने नकार दिला.
advertisement
7/8
मोहसीन उर्मिलाच्या प्रेमामध्ये आकंठ बुडाला होता. त्यामुळे तो तिच्यासोबत दररोज बोलण्याचा प्रयत्न करायचा. पण ती अनेकदा त्याच्यासोबत नव्हती बोलत. यानंतर उर्मिलाने मोहसीनला होकार दर्शवला. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाचा विचार केला तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मोहसिन उर्मिला पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. सर्व बंधन मोडत उर्मिलाने वयाच्या 42 व्या वर्षी मोहसीनसोबत लग्न केलं.
advertisement
8/8
धर्माचे सर्व बंधन जुगारून लग्न केलं तर खरं पण त्यांनी आठ वर्षांनंतर एकमेकांसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर 2024 मध्ये या दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Urmila Matondkar Birthday: डायरेक्टरसोबतच अफेअर पडलं महागात, मराठमोळ्या अभिनेत्रीने बरबाद केलं स्वतःचं आयुष्य, इंडस्ट्रीतून गायब