प्रवाशांनी भरलेली दोन विमाने आणि एक चूक, मुंबई विमानतळावरील दुर्घटनेचे PHOTO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत दोन विमानांची आपआपसात टक्कर झाल्याची माहिती आहे. पण सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. पण या घटनेने खळबळ माजली.
advertisement
1/7

मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत दोन विमानांची आपआपसात टक्कर झाल्याची माहिती आहे. पण सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. पण या घटनेने खळबळ माजली.
advertisement
2/7
देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असणाऱ्या मुंबई विमानतळावर ही घटना आज मंगळवारी रात्री घडली आहे. या घटनेत दोन विमानांची एकमेकांना टक्कर झाल्याची माहिती आहे.एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाची ही धडक झाली आहे.
advertisement
3/7
एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्स या दोन्ही विमानाची पंखं एकमेकांना घासली आहे. सुदैवाने दोन्ही विमानांचाा वेग कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दोन्ही विमानातील प्रवासी सुखरूप आहे. या दुर्घटनेमध्ये दोन्ही विमानांचं किरकोळ नुकसान झालं आहे.
advertisement
4/7
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकले. एअर इंडियाचं विमान AI2732 हे उड्डाणासाठी रनवेकडे जात होतं. तर त्याचवेळी इंडिगोच्या एका विमान लँडिंग झालं होतं. हे विमान टॅक्सी वे 'B1' ला जोडण्यासाठी टॅक्सिंइंग करत होतं.
advertisement
5/7
दोन्ही विमानांच्या उजव्या पंखांची टोकं एकमेकांना घासली. अपघाताच्या वेळी दोन्ही विमानं हे रनवेकडे धीम्या गतीने जात होती. त्यावेळी ही घटना घडला. या घटनेनंतर दोन्ही विमानं थांबवण्यात आली. विमानातील प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं आहे. दोन्ही विमानं दुरुस्तीसाठी रवाना झाली आहेत.
advertisement
6/7
इंडिगो एअरलाईन्सकडून खुलासा करण्यात आला आहे. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी हैदराबादहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइट 6E 791 च्या विमानाचे पंखे लँडिंगच्या वेळी एअर इंडियाच्या विमानाला घासले गेले. या दुर्घटनेमध्ये सर्व प्रवासी सुरक्षित आहे. विमानं पार्क केल्यानंतर सगळ्या प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त विमानाची तपासणी सुरू आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्याची माहिती तातडीने देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. असं इंडिगोकडून स्पष्ट करण्यात आलं.
advertisement
7/7
दरम्यान या प्रकरणी डीजीसीएने चौकशी केली असून दोन्ही विमान कंपन्यांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
प्रवाशांनी भरलेली दोन विमाने आणि एक चूक, मुंबई विमानतळावरील दुर्घटनेचे PHOTO