Apurva Gore: 'आई कुठे काय करते' फेम 'ईशा' चढणार बोहल्यावर! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Apurva Gore: अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा होणारा नवरा पाठमोरा दिसत होता. चेहरा लपवल्यामुळे "हा मिस्ट्री मॅन नक्की कोण?" अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली होती. पण आता या गुपितावरून पडदा सरकला आहे.
advertisement
1/8

मराठी मालिका </a>विश्वात 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिका संपली असली तरी त्यातील पात्रं आजही प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहेत. या मालिकेत अरुंधतीची लाडकी लेक 'ईशा'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे सध्या एका खास कारणाने चर्चेत आली आहे." width="201" height="251" /> मराठी मालिका विश्वात 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिका संपली असली तरी त्यातील पात्रं आजही प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहेत. या मालिकेत अरुंधतीची लाडकी लेक 'ईशा'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे सध्या एका खास कारणाने चर्चेत आली आहे.
advertisement
2/8
अपूर्वाने नुकतेच सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याचे काही रोमँटिक फोटो शेअर केले. एका फोटोत ती पिवळ्या धमक फुलांच्या सानिध्यात असून तिने कॅप्शन दिलंय, "चाफा आणि तो... मला खूप आवडतात... #ठरलं".
advertisement
3/8
सुरुवातीला अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा होणारा नवरा पाठमोरा दिसत होता. चेहरा लपवल्यामुळे "हा मिस्ट्री मॅन नक्की कोण?" अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली होती. पण आता या गुपितावरून पडदा सरकला आहे.
advertisement
4/8
राजश्री मराठीने दिलेल्या माहितीनुसार, अपूर्वा गोरे लवकरच अंशुमन जोशी याच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. अंशुमन हे नाव मराठी प्रेक्षकांसाठी नवीन नाही.
advertisement
5/8
सुजय डहाके दिग्दर्शित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'शाळा' चित्रपटात ज्याने आपल्या निरागस अभिनयाने सर्वांना वेड लावलं होतं, तोच हा लाडका 'मुकुंद जोशी'! अपूर्वा आणि अंशुमन ही जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र येत असल्याने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
advertisement
6/8
अंशुमनने 'शाळा' नंतर आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'फास्टर फेणे', 'फुंतरू', 'म्हैस' आणि 'फोटोकॉपी' यांसारख्या चित्रपटांत त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. इतकंच नाही, तर दिवंगत इरफान खान यांच्यासोबत 'कारवाँ' या हिंदी चित्रपटातही तो झळकला होता.
advertisement
7/8
आज अंशुमन केवळ एक अभिनेता नसून तो एक उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि फोटोग्राफर म्हणूनही नाव कमवत आहे. त्याच्या कॅमेऱ्यातून टिपलेले अप्रतिम फोटो सोशल मीडियावर नेहमीच पसंतीस उतरतात.
advertisement
8/8
अपूर्वा आणि अंशुमनच्या या नवीन प्रवासासाठी 'आई कुठे काय करते' मालिकेतील तिची आई म्हणजेच मधुराणी प्रभुलकर आणि इतर सहकलाकारांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Apurva Gore: 'आई कुठे काय करते' फेम 'ईशा' चढणार बोहल्यावर! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा