IND vs PAK : खूप झाला ड्रामा, आता पाकिस्तान भिकेला लागणार, ICC कठोरात कठोर कारवाई करणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
येत्या 7 फ्रेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्ड कपला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी पाकिस्तानने वर्ल्ड कप खेळण्याची तयारी दर्शवली आहे, पण भारतासोबत खेळण्यात नकार दिला आहे.
advertisement
1/7

येत्या 7 फ्रेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्ड कपला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी पाकिस्तानने वर्ल्ड कप खेळण्याची तयारी दर्शवली आहे, पण भारतासोबत खेळण्यात नकार दिला आहे.
advertisement
2/7
भारत आणि पाकिस्तान 15 फेब्रुवारी 2026 ला श्रीलंकेच्या प्रेमादास स्टेडिअमवर आमने सामने येणार होते. पण पाकिस्तानने भारतासोबत खेळण्यास नकार दिला आहे. या नकारानंतर वाद पेटला आहे.
advertisement
3/7
पाकिस्तानच्या या भूमिकेनंतर आयसीसीचं आणि पाकिस्तानच मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे आयसीसी पाकिस्तानवर दंडासोबत मोठी कारवाई करण्याच्या विचारात आहे.
advertisement
4/7
आता आयसीसी स्पर्धेत ज्या ज्या भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येतात. त्या त्या वेळी आयसीसीला जवळपास 250 मिलियन डॉलर म्हणजेच (2200 करोड हून अधिक) महसूल मिळतो.
advertisement
5/7
काही मिडीयी रिपोर्टमध्ये हा महसूल 3000 करोड हून अधिक होत असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत जर हा सामना पार पडला नाही. तर प्रायोजकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
advertisement
6/7
पाकिस्तानची वर्षभराची कमाई जवळपास 35-45 डॉलर म्हणजेच 300 ते 400 करोड. यामध्ये आयसीसीकडून मिळणार उत्पन्न, पीएसएलची कमाई, सामन्यांचे तिकीटांची कमाई असं सगळंच आलं.
advertisement
7/7
त्यामुळे पाकिस्तान 7 वर्षात जितकी कमाई करते तितकी कमाई आयसीसी भारत पाकिस्तानच्या एका सामन्यातून करते.त्यामुळे जर नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर पाकिस्तान भिकेलाच लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : खूप झाला ड्रामा, आता पाकिस्तान भिकेला लागणार, ICC कठोरात कठोर कारवाई करणार