खोलीत उंदीर, छपरातून गळायचं पाणी; करिअरसाठी मुंबई आला अभिनेता अन् सुरू झाला लाइफचा नवा मोड
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Vaibhav Tatwawadi : मुंबईसारख्या धावत्या शहरात राहणं सोपं नाहीये. अभिनेता वैभव तत्त्ववादीने देखील मुंबईत येऊन स्ट्रगल केला. त्याला लोकलने फिरण्याचीही भीती वाटायची.
advertisement
1/9

मराठी मनोरंजन क्षेत्रातील हँडसम, चॉकलेट बॉस अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी. भन्साळींच्या सिनेमात दमदार भूमिकेत हजेरी लावणाऱ्या वैभवनं अभिनय क्षेत्रात विवधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
2/9
वैभव देखील त्याचं घर सोडून मुंबई करिअर करण्यासाठी आला. पण मुंबईत राहणं आणि इथे आपला जम बसवणं त्याच्यासाठीही कठीण होतं.
advertisement
3/9
वैभवचा जन्म 25 सप्टेंबर 1988 साली झाला. तो मुळचा नागपूरचा. शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो पुण्यात आला. पुण्यात तो इंजिनिअर झाला. अभिनयाच्या ओढीनं त्याला मुंबईत आणलं. मुंबईत आल्यानंतर मात्र स्ट्रगल त्याच्याही वाट्याला आला.
advertisement
4/9
मुंबईत आल्यानंतर अभिनयात रूळण्यासाठी काही दिवस लागले. त्याआधी त्याला मुंबई शहराशी जुळवून घ्यावं लागलं. वैभवचा मुंबईतील सुरुवातीचाप्रवास कठीण प्रसंगांनी भरलेला होता.
advertisement
5/9
वैभव पहिल्यांदा मुंबईत आला तेव्हा एका लहानशी खोलीत राहायचा. त्या खोलीत पावसाळ्यात छताचं पाणी पडायचं. इतकंच नाही तर उंदीरही घरात शिरायचे. अशा परिस्थितीत मागे न हटता त्याने काम सुरू ठेवलं.
advertisement
6/9
मुंबईत काम मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी फिरावं लागायचं. मुंबई गाडीने फिरण्याचा खर्च परवडण्यासारखा नव्हता. त्यामुळे लोकल बेस्ट होती. वैभवला लोकलचा अजिबात अनुभव नव्हता. सुरुवातीच्या काळात तीन - चार लोकल तो सोडून द्यायचा आणि स्टेशनवर असाच उभा राहायचा.
advertisement
7/9
मुंबईच्या गर्दीत पाकिटचोर, मोबाईल चोर असतात, आपलं सामान चोरीला जाईल ही भीती त्याच्या मनात होती. या दिवसांत मित्राचा सल्ला वैभवच्या कामी आला.
advertisement
8/9
ट्रेनमध्ये चढताना बॅग पुढ्यात धरून चालायचं असा सल्ला मित्राने दिला आणि वैभवचा प्रवास सुखकर होऊ लागला. मित्रांच्या टिप्सने माझं मुंबईतील आयुष्य सावरलं असं वैभवने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
advertisement
9/9
वैभवच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास त्याने आतापर्यंत 'फक्त लढ म्हणा', 'कुरुक्षेत्र', 'सूराज्य', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'पॉन्डिचेरी' सारख्या मराठी सिनेमात तसंच 'बाजीराव मस्तानी', 'लिप्स्टिक अंडर माय बुरखा', 'हंटर', 'मनीकर्णिका', 'त्रिभंगा', 'आर्टिकल 370' सारख्या हिंदी सिनेमातही काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
खोलीत उंदीर, छपरातून गळायचं पाणी; करिअरसाठी मुंबई आला अभिनेता अन् सुरू झाला लाइफचा नवा मोड