TRENDING:

५० वर्षांची प्रतीक्षा संपली! दसऱ्याच्या दिवशी या राशीच्या लोकांकडे येणार खरं सोनं, बँक बॅलेन्स वाढणार

Last Updated:
Astrology News : वैदिक पंचांगानुसार ग्रह आपल्या गतीनुसार गोचर करून ठराविक स्थानी येतात आणि इतर ग्रहांशी युती करतात.
advertisement
1/5
दसऱ्याच्या दिवशी या राशीच्या लोकांकडे येणार खरं सोनं, बँक बॅलेन्स वाढणार
वैदिक पंचांगानुसार ग्रह आपल्या गतीनुसार गोचर करून ठराविक स्थानी येतात आणि इतर ग्रहांशी युती करतात. यामुळे माणसाच्या जीवनावर तसेच समाज-देशावरही थेट परिणाम दिसून येतो. यंदा २ ऑक्टोबर रोजी, दसऱ्याच्या शुभदिनी, तूळ राशीत बुध आणि मंगळ युती करणार आहेत.
advertisement
2/5
<strong>मेष राशी : </strong>  मेष राशीच्या लोकांसाठी बुध-मंगळ युती अत्यंत लाभदायी ठरू शकते. ही युती तुमच्या सप्तम भावावर होत असल्याने वैवाहिक जीवनात समाधान आणि आनंद वाढेल. विवाहितांसाठी परस्परांतील नात्यात अधिक जिव्हाळा निर्माण होईल. व्यावसायिक दृष्ट्या पार्टनरशीपमधील कामे यशस्वी होतील. तुमच्या आत्मविश्वास आणि धैर्यात वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. करिअरमध्ये प्रगती होईल आणि समाजात मान-सन्मान मिळेल.
advertisement
3/5
<strong>धनु राशी : </strong>  धनु राशीसाठी ही युती आय आणि नफ्याच्या स्थळी होत असल्याने उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील. जर तुम्ही आर्थिक निर्णयांमध्ये योग्य नियोजन केले, तर चांगला फायदा मिळेल. व्यवसाय आणि व्यापारी क्षेत्रात नवीन करार मिळू शकतात. या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याबरोबरच मित्रपरिवाराकडून सहकार्य मिळेल.
advertisement
4/5
<strong>कर्क राशी :   </strong>कर्क राशीच्या लोकांसाठी बुध-मंगळ युती चतुर्थ भावावर होत आहे. त्यामुळे या काळात भौतिक सुखसोयी वाढतील. वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते किंवा मालमत्तेत गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबतीत लाभ होईल. वारसाहक्काची संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. काम-धंद्यात प्रगती होईल. आई व सासरकडील नातेसंबंध अधिक मजबूत होतील. घरगुती वातावरण शांत आणि आनंदी राहील.
advertisement
5/5
<strong>(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
५० वर्षांची प्रतीक्षा संपली! दसऱ्याच्या दिवशी या राशीच्या लोकांकडे येणार खरं सोनं, बँक बॅलेन्स वाढणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल