TRENDING:

Train Accident : ट्रेनवर ट्रेन चढली, अपघात कसा झाला? 10 तासांच्या रेस्क्यूनंतरची थरारक दृश्यं, लोको पायलटसह 11 प्रवाशांचा मृत्यू

Last Updated:
बिलासपूर येथे मेमू पॅसेंजर लोकलने मालगाडीला धडक दिल्याने ११ जणांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी, सिग्नलिंग सिस्टीम आणि चालकाच्या चुकांची चौकशी सुरू.
advertisement
1/9
ट्रेनवर ट्रेन चढली, अपघात कसा झाला? 10 तासांच्या रेस्क्यूनंतरची थरारक दृश्यं
Train Accident : भरधाव ट्रेन मालगाडीवर धडकली, किंकाळण्याचे आवज आले, जोरात झटका बसला, काही कळण्याच्या आत इतका भीषण अपघात झाला होता की विचारही केला तरी अंगावर काटा येईल. ट्रेनवर ट्रेनचा डबा चढला होता. या भीषण अपघाताची माहिती मिळताच तातडीनं अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
advertisement
2/9
छत्तीसगडमधील बिलासपूर इथे सोमवारी सायंकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातानं पुन्हा एकदा रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे. या अपघातात मेमू पॅसेंजर लोकल ट्रेनने समोर उभ्या असलेल्या मालगाडीला मागून जोरदार धडक दिली, ज्यात लोको पायलटसह ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
3/9
सोमवारी साधारण संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बिलासपूर स्टेशनच्या यार्डजवळ हा अपघात झाला. ही धडक इतकी जबरदस्त होती की, पॅसेंजर ट्रेनचा एक डबा मालगाडीच्या अगदी वर चढला. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मेमू लोकल ट्रेनने निर्धारित सिग्नल पार केला आणि हा अपघात घडला.
advertisement
4/9
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या सूत्रांनी सांगितले की, प्रथमदर्शनी सिग्नल ओलांडणे हेच या दुर्घटनेचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. रेल्वेच्या ऑपरेशन विभागाच्या माहितीनुसार, मेमू ट्रेन बिलासपूर स्टेशनजवळ पोहोचत असताना समोरच्या मार्गावर एक मालगाडी आधीच उभी होती. मेमू ट्रेनचा चालक सिग्नलवर थांबण्यात अयशस्वी ठरला आणि ट्रेन थेट मालगाडीवर आदळली.
advertisement
5/9
या अपघाताच्या चौकशीत आता मेमू लोकलने सिग्नल का तोडला, याचे मूळ कारण शोधण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सिग्नल ओलांडण्यामागे कोणती तांत्रिक बिघाड होती की चालकाची मानवी चूक होती, याचा तपास रेल्वेचे पथक करत आहे.
advertisement
6/9
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मेमू गाड्यांमध्ये आधुनिक सिग्नलिंग आणि ब्रेकिंग सिस्टीम असल्याने अशा प्रकारच्या चुका कमीच होतात. त्यामुळे अपघातावेळी ट्रेनचा वेग किती होता आणि ब्रेकिंग सिस्टीम योग्यरित्या कार्यरत होती की नाही, याची कसून चौकशी सुरू आहे.
advertisement
7/9
सध्या लोको पायलटची चूक होती की सिस्टीम फेलियर झाले, हे लगेच सांगणे घाईचे ठरेल, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. अपघाताचे सखोल विश्लेषण केले जात आहे.धडकेनंतर बिलासपूर स्टेशन यार्डात तात्काळ गोंधळ माजला. मदत आणि बचाव पथकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
advertisement
8/9
जवळपास 10 तासाहून अधिक काळ हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. 11 प्रवाशांच्या मृत्यूची आणि सुमारे डझनभर लोक जखमी झाल्याची पुष्टी झाली आहे.
advertisement
9/9
घटनेच्या ठिकाणी रेल्वेचे उच्च अधिकारी आणि तांत्रिक तज्ज्ञ उपस्थित आहेत. या दुर्घटनेनंतर रेल्वेने संपूर्ण सिग्नलिंग सिस्टीमची समग्र चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, मेमू ट्रेनच्या चालकाला सिग्नलची योग्य माहिती वेळेवर मिळाली होती की नाही, याबद्दलची देखील तपासणी केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Train Accident : ट्रेनवर ट्रेन चढली, अपघात कसा झाला? 10 तासांच्या रेस्क्यूनंतरची थरारक दृश्यं, लोको पायलटसह 11 प्रवाशांचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल