TRENDING:

Aajache Rashibhavishya: तुम्हीच किती सोसायचं? बुधवारी हवं ते मिळणार, नशीब पालटणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: आजचा बुधवार मेष ते मीन 12 राशींसाठी वेगवेगळी फळं देणारा असेल. प्रेम, प्रतिष्ठा, पैसा, विवाह, आरोग्य, नोकरी याबाबत तुमच्या नशिबात काय? आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13
तुम्हीच किती सोसायचं? बुधवारी हवं ते मिळणार, नशीब पालटणार,आजचं राशीभविष्य
मेष राशी -शारीरिक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मिळवाल. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी-प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. नको असलेले कामे टाळा. असे केल्यास नक्की फायदा जाणवेल. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी -तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा, केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्यांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. आज तुमचा शुभ अंक 6 आहे.
advertisement
4/13
कर्क राशी -आजच्या दिवशी धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून देवाण-घेवाणीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी -अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आज मार्गी लागतील. तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे, कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. आजचा दिवस हा तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा. हातात घेतलेली कामे पूर्ण करा योग्य फळ प्राप्त होईल. आज तुमचा शुभ अंक 4 आहे.
advertisement
6/13
कन्या राशी -विवाहित लोकांना आज आनंदाची बातमी मिळू शकते. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार पुरेसा वेळ देईल. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
7/13
तुळ राशी -तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलंत तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस आनंद घेऊन येईल. तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी -आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी -तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर, आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभ ही होऊ शकतो. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी -निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. आज कुणी जवळच्या व्यक्ती सोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी -गरज नसलेले कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, ज्या लोकांनी नातेवाइकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावी लागू शकते. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केवळ तुम्हीच नाही तर तुमचे कुटुंबीयदेखील मोहीत होतील. आर्थिक लाभ होऊ शकतो. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी -भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल - पुढे काय करायचे हे ठरविणे अवघड होऊन बसेल. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. व्यापारी वर्गाला आज चांगलाच फायदा होणार आहे. आज तुमच्या साठी शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: तुम्हीच किती सोसायचं? बुधवारी हवं ते मिळणार, नशीब पालटणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल