TRENDING:

मंगळ-शुक्राची युती! मकर संक्रांत होताच 'या' राशींना मालामाल करणार, बँक बॅलेन्स डबल होणार

Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला आणि त्यांच्या परस्पर संयोगाला विशेष महत्त्व दिले जाते. प्रत्येक ग्रह विशिष्ट गुणधर्मांचे प्रतिनिधित्व करतो.
advertisement
1/6
मंगळ शुक्राची युती! मकर संक्रांत होताच 'या' राशींना मालामाल करणार
वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला आणि त्यांच्या परस्पर संयोगाला विशेष महत्त्व दिले जाते. प्रत्येक ग्रह विशिष्ट गुणधर्मांचे प्रतिनिधित्व करतो. शुक्र ग्रहाला संपत्ती, ऐश्वर्य, सुख-सुविधा, कला, प्रेम आणि वैवाहिक आनंदाचा कारक मानले जाते. तर मंगळ ग्रह पराक्रम, धाडस, आत्मविश्वास, ऊर्जा आणि संघर्षाचे प्रतीक आहे. हे दोन्ही ग्रह जेव्हा एकत्र येतात, तेव्हा जीवनाच्या भौतिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता या युतीमध्ये असते.
advertisement
2/6
सध्या शुक्र ग्रह धनु राशीत भ्रमण करत आहे. मात्र १२ जानेवारी रोजी शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर अवघ्या काही दिवसांत, म्हणजेच १६ जानेवारीला मंगळ ग्रहही मकर राशीत दाखल होणार आहे. विशेष बाब म्हणजे मंगळ ग्रह मकर राशीत उच्चाचा मानला जातो. त्यामुळे या राशीत मंगळ अधिक प्रभावी ठरतो. शुक्र आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची १६ जानेवारीला मकर राशीत युती होणार असून, हा योग अनेक राशींसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
advertisement
3/6
या ग्रहयोगाचा प्रभाव सर्वच राशींवर कमी-अधिक प्रमाणात जाणवेल. मात्र ज्योतिष अभ्यासकांच्या मते वृषभ, तूळ आणि धनु या तीन राशींवर या युतीचा विशेष सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. या राशींच्या जीवनात आर्थिक, व्यावसायिक तसेच वैयक्तिक पातळीवर आनंददायी घडामोडी घडू शकतात.
advertisement
4/6
वृषभ रास : वृषभ राशीचे स्वामी शुक्र असल्यामुळे या युतीचा लाभ या राशीच्या लोकांना अधिक मिळण्याची शक्यता आहे. मंगळ आणि शुक्राच्या संयोगामुळे भाग्याची साथ मिळेल. अडलेली कामे पूर्ण होण्यास गती येईल. अचानक धनलाभाचे योग निर्माण होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील आणि नफ्यात वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, मान-सन्मान किंवा पगारवाढीची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल असून, परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
5/6
तूळ रास : तूळ राशीचे स्वामी देखील शुक्र असल्याने या राशीवर शुक्र-मंगळ युतीचा शुभ प्रभाव दिसून येईल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. वाहन, घर किंवा मौल्यवान वस्तू खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होण्यास सुरुवात होईल आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
धनु रास : धनु राशीतील लोकांसाठी हा काळ विशेषतः संवाद आणि व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. तुमच्या वाणीत प्रभाव निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही इतरांना सहज आकर्षित करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल. अडथळ्यांशिवाय कामे पूर्ण होतील. काही लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
मंगळ-शुक्राची युती! मकर संक्रांत होताच 'या' राशींना मालामाल करणार, बँक बॅलेन्स डबल होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल