TRENDING:

Weather Alert: कल्याण-डोंबिवलीतील हवामानात मोठे बदल, पारा 9 च्या खाली, 12 डिसेंबरला अलर्ट

Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज पुन्हा पारा घसरला असून तापमानात मोठी घट झालीये.
advertisement
1/5
कल्याण-डोंबिवलीतील हवामानात मोठे बदल, पारा 9 च्या खाली, 12 डिसेंबरला अलर्ट
महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल जाणवत असून थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर काही भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता निर्माण झालीये. मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली असून धोका वाढला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील हवामान अपडटे जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून हवामान स्थिर असून किमान तापमान 19 अंश तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग मंद आल्याने हलक्या स्वरूपात थंडी जाणवेल. हवेची गुवणत्ता (AQI) खालावल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
3/5
डोंबिवलीमध्ये हवामान स्वच्छ आणि अंशतः ढगाळ राहण्याची राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल 31अंश सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता (AQI) मध्यम ते प्रदूषित श्रेणीत असल्याने पुढील काळात सतर्क राहून आरोग्याची काळजी घ्यावी.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान निरभ्र आणि काहीसे धुके असण्याची शक्यता आहे. ज्यात किमान तापमान 15 अंश तर कमाल 32 अंश सेल्सिअस पर्यंत असू शकते. आज दिवसा हलके वारे वाहत असल्याने उशिराने ऊबदारपणा आणि रात्री चांगली थंडी जाणवेल.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये आज सकाळच्या वेळी दव आणि हलकी थंडी जाणवेल. तर हवामान कोरडे आणि निरभ्र राहील. किमान तापमान 9 अंश सेल्सिअस तर कमाल 25 अंश सेल्सिअस असेल. शहापूर मुरबाड मध्ये स्वच्छ आणि आल्हाददायक हवामान असेल. किमान तापमान 18 अंश तर कमाल 32 अंश सेल्सिअस असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीतील हवामानात मोठे बदल, पारा 9 च्या खाली, 12 डिसेंबरला अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल