New zealand vs india : मॅच जिंकली पण टीम इंडियाला 'जोर का झटका', ऋषभ पंतनंतर 26 वर्षांचा मॅचविनर खेळाडू सीरिजमधून 'आऊट'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Washington Sundar injury Update : वॉशिंग्टन सुंदर याला न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये बॉलिंग करताना 'साईड स्ट्रेन'ची समस्या जाणवली. या दुखापतीमुळे त्याने केवळ 5 ओव्हर टाकल्या आणि त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला.
advertisement
1/7

टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्धचा पहिला वनडे सामना रविवारी पार पडला असून या मॅचमध्ये भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला असला तरी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे.
advertisement
2/7
बडोदा येथे खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये ऋषभ पंतनंतर खेळाडूला दुखापत झाली असून त्याला आता संपूर्ण सिरीजमधून बाहेर पडावं लागलं आहे. यामुळे कॅप्टन शुभमन गिल आणि टीम मॅनेजमेंटच्या अडचणीत वाढ झालीये.
advertisement
3/7
वॉशिंग्टन सुंदर याला न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये बॉलिंग करताना 'साईड स्ट्रेन'ची समस्या जाणवली. या दुखापतीमुळे त्याने केवळ 5 ओव्हर टाकल्या आणि त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला.
advertisement
4/7
सुंदरच्या जागी ध्रुव जुरेल सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून मैदानात आला होता. सुंदर बॅटिंगला येणार की नाही याबाबत साशंकता होती, मात्र टीम इंडियाच्या लागोपाठ विकेट्स पडल्यामुळे त्याला मैदानात उतरावे लागले.
advertisement
5/7
या दुखापतीमुळे सुंदर आता उर्वरित वनडे सिरीजमध्ये खेळू शकणार नाही. विशेष म्हणजे, या सिरीजपूर्वीच ऋषभ पंतला देखील अशाच प्रकारच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर आता दुसरा धक्का बसलाय. बीसीसीआय अजून अधिकृत घोषणा केली नाहीये.
advertisement
6/7
शुभमन गिलने सामन्यानंतर स्पष्ट केलं की, सुंदरला स्कॅनिंगसाठी पाठवण्यात आले असून त्याची दुखापत गंभीर असल्याचे प्राथमिक अंदाजात दिसून आलं आहे. आगामी 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर सुंदरची ही दुखापत भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकते.
advertisement
7/7
दरम्यान, जर वॉशिंग्टन सुंदरला बाहेर बसावं लागलं तर बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून कुणाची वर्णी लागणार? असा सवाल विचारला जातोय. आगामी सामन्यात बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून नितिश कुमार रेड्डीला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलं जाऊ शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
New zealand vs india : मॅच जिंकली पण टीम इंडियाला 'जोर का झटका', ऋषभ पंतनंतर 26 वर्षांचा मॅचविनर खेळाडू सीरिजमधून 'आऊट'