शिव ठाकरेने गुपचूप उरकलं लग्न? विवाहसोहळ्यातील तो PHOTO शेअर, कोण आहे त्याची नवरी?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Shiv Thakare : शिव ठाकरेने गुपचूप लग्न उरकलं असल्याचं समोर आलं आहे. त्याने स्वत: विवाहसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
advertisement
1/7

'बिग बॉस' फेम शिव ठाकरेने गुपचूप लग्न उरकलं असल्याचं समोर आलं आहे. 'आपला माणूस' शिव ठाकरेने स्वत: विवाहसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
advertisement
2/7
शिव ठाकरे 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वातील त्याची आणि वीणा जगतापची जोडी चांगलीच गाजली होती. त्यांच्यात प्रेमदेखील फुललं होतं.
advertisement
3/7
वीणा जगतापने आपल्या हातावर 'शिव'च्या नावाचा टॅटूदेखील काढत आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. पण काही कारणाने त्यांचं नातं तुटलं. शिव आणि वीणाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. पण ते विभक्त झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला.
advertisement
4/7
'बिग बॉस मराठी' गाजवल्यानंतर शिव ठाकरे 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी झाला होता. यावेळी एका तरुणीने शिवला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. तिने शिवला खास प्रेम पत्र लिहिलं होतं.
advertisement
5/7
शिव ठाकरेच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. शिवच्या लग्नाबाबत त्याच्या आईनेदेखील अनेकदा भाष्य केलं आहे. अमरावतीमधील मुलीशी शिवने लग्न करावं, अशी इच्छा त्याच्या आईने व्यक्त केली होती.
advertisement
6/7
शिव ठाकरेने गेले काही दिवस लग्नापेक्षा करिअरकडे आपलं लक्ष दिलं होतं. एका मुलाखतीत त्याने लग्नाची भीती वाटत असल्याचं सांगितलं होतं.
advertisement
7/7
शिव ठाकरेने आता 2026 च्या सुरुवातीलाच गुपचूप लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. विवाहसोहळ्यातील फोटो शेअर करत त्याने 'फायनली' असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये त्याने आपल्या पत्नीचा चेहरा मात्र लपवलेला आहे. शिवच्या या फोटोवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शिव ठाकरेने गुपचूप उरकलं लग्न? विवाहसोहळ्यातील तो PHOTO शेअर, कोण आहे त्याची नवरी?