TRENDING:

साक्षात निळकंठ! जायकवाडीत ‘शंकर’ दर्शन, युरोपातून 7000 किमीचा प्रवास, का आहे खास?

Last Updated:
Jayakwadi Dam: सध्याच्या हिवाळ्यात निळकंठाने जायकवाडी परिसराला मुक्कामासाठी पसंती दिल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
advertisement
1/7
साक्षात निळकंठ! जायकवाडीत ‘शंकर’ दर्शन, युरोपातून 7000 किमीचा प्रवास, का आहे खास
‎तब्बल चार ते सात हजार किलोमीटरचा प्रवास करून शंकर म्हणजेच निळकंठ मराठवाड्यात दाखल झाला आहे. ब्लूथ्रोट म्हणून ओळखला जाणारा दुर्मिळ स्थलांतरित पक्षी यंदाच्या हिवाळ्यात जायकवाडी धरण परिसरात आढळून आला आहे.
advertisement
2/7
युरोप आणि मध्य आशियातील थंड प्रदेशातून तो याठिकाणी येतो. पक्षीनिरीक्षक सुनील पायघन यांनी काढलेल्या छायाचित्रांमुळे या पक्ष्याची जायकवाडीवरील उपस्थिती अधोरेखित झाली आहे.
advertisement
3/7
‎शनिवारी दुपारी जायकवाडी धरणाच्या पाणथळ भागात पक्षी निरीक्षण करत असताना सुनील पायघन यांच्या निदर्शनास हा वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आला. त्यांनी क्षणात कॅमेऱ्यात हा दुर्मिळ क्षण टिपला.
advertisement
4/7
सध्याच्या हिवाळ्यात निळकंठाने जायकवाडी परिसराला मुक्कामासाठी पसंती दिल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
advertisement
5/7
ब्लूथ्रोट हा पक्षी मूळचा युरोप, स्कँडिनेव्हिया, सायबेरिया आणि मध्य आशियातील भागात आढळतो, जिथे तो प्रजनन करतो. थंडीची तीव्रता वाढल्यानंतर तो स्थलांतर करत भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका अशा दक्षिण आशियातील देशांकडे येतो. प्रवासादरम्यान पाणथळ, दलदलीचे व गवताळ प्रदेश हे त्याचे आवडते थांबे असतात.
advertisement
6/7
‎रंगसंगतीमुळे निळकंठ पक्षी सहज ओळखता येतो. घशावरील उठावदार निळी पट्टी हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यासोबतच शरीरावर तांबूस रंगछटा, पांढरे ठिपके तसेच तपकिरी-करड्या रंगांचे मिश्रण दिसून येते, ज्यामुळे हा पक्षी अधिक आकर्षक भासतो.
advertisement
7/7
‎जायकवाडी परिसरात ब्लूथ्रोट (शंकर/निळकंठ) पक्ष्याचे छायाचित्रासह निरीक्षण होणे ही निसर्गप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांसाठी महत्त्वाची नोंद असल्याचे सुनील पायघन यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
साक्षात निळकंठ! जायकवाडीत ‘शंकर’ दर्शन, युरोपातून 7000 किमीचा प्रवास, का आहे खास?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल