Rashmika-Vijay: शाही लग्नसोहळ्यानंतर रश्मिका-विजयचं पॅन इंडिया सेलिब्रेशन, फॅन्ससोबत 'असा' शेअर केला आनंद
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या शाही विवाहाच्या चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत, तोच या नवदंपतीने चाहत्यांची मनं जिंकणारा एक मोठा निर्णय घेतला.
advertisement
1/9

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या शाही विवाहाच्या चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत, तोच या नवदंपतीने चाहत्यांची मनं जिंकणारा एक मोठा निर्णय घेतला.
advertisement
2/9
२६ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये रेशीमगाठीत अडकलेल्या या जोडीने आपल्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या आनंदाचा वाटा थेट सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं आहे. १ मार्च रोजी संपूर्ण देशात या जोडीतर्फे मिठाईचं वाटप आणि अन्नदान केलं गेलं.
advertisement
3/9
विजय आणि रश्मिकाने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या या उपक्रमाची माहिती दिली.
advertisement
4/9
त्यांनी लिहिलं की, "या देशातील सुंदर लोकांनो, तुम्ही नेहमीच आमच्या प्रवासाचा आणि प्रेमाचा भाग राहिला आहात. आमचं लग्न तुमच्यासोबत साजरं करणं आम्हाला खरोखर सुखावह वाटेल. आणि भारतात कोणताही आनंद कसा साजरा होतो? तर मिठाई आणि अन्नाने. म्हणूनच १ मार्च रोजी आम्ही प्रेमाने भरलेले मिठाईचे ट्रक देशभरात पाठवत आहोत."
advertisement
5/9
केवळ मिठाईच नाही, तर देशातील अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये या जोडीतर्फे अन्नदान देखील केलं जात आहे. "तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे," अशी विनंतीही त्यांनी चाहत्यांना केली आहे.
advertisement
6/9
हैदराबाद, मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि अहमदाबाद यांसारख्या मोठ्या शहरांसह एकूण २० हून अधिक शहरांमध्ये हा उपक्रम राबवला गेला.
advertisement
7/9
यामध्ये विशाखापट्टणम, विजयवाडा, कोची, म्हैसूर, कूर्ग, कोईमतूर आणि पाँडेचेरी या शहरांचाही समावेश होता. चाहत्यांना आपल्या लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी करून घेण्याची ही या जोडीची पद्धत सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरली.
advertisement
8/9
लग्नाच्या धामधुमीतच या जोडीच्या आगामी 'रणबाली' (Ranabaali) या चित्रपटाचं गाणं 'एंधय्या सामी' प्रदर्शित झालं आहे. १८५० च्या दशकातील सत्य घटनांवर आधारित या चित्रपटात विजय 'रणबाली'च्या तर रश्मिका त्याच्या पत्नीच्या, म्हणजेच 'जयाम्मा'च्या भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
9/9
विशेष म्हणजे, यात 'द मम्मी' फेम हॉलिवूड अभिनेता अरनॉल्ड व्होस्लू खलनायकाच्या भूमिकेत आहे. 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' नंतर लग्नानंतरचा हा त्यांचा पहिलाच एकत्रित चित्रपट असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika-Vijay: शाही लग्नसोहळ्यानंतर रश्मिका-विजयचं पॅन इंडिया सेलिब्रेशन, फॅन्ससोबत 'असा' शेअर केला आनंद