TRENDING:

BJP vs Shiv Sena Ambernath : भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!

Last Updated:

Ambernath Nagar Parishad: शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजप पुरता घायाळ झाला असल्याचे चित्र आहे..

advertisement
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेना शिंदे गटाची अंबरनाथमधून सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जंग पछाडलं. नगराध्यक्ष निवडून आला तरी मात्र सत्तेची सूत्रे शिंदे गटाच्या हाती असणार आहे. शिंदे गटाने भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत हातमिळवणी करत सगळा गेम फिरवला. शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजप पुरता घायाळ झाला असल्याचे चित्र आहे..
भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
advertisement

भाजपला जोरदार धक्का देत शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा सोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून 'नॉट रिचेबल' असलेले नगरसेवक आज अंबरनाथमध्ये दाखल झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

'शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी'ची स्थापना...

अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेनेने नवी रणनीती आखली. "शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी" या नावाने आज सत्ता स्थापनेचा अधिकृत दावा केला जाणार आहे. यामध्ये शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व नगरसेवकांना गेल्या काही दिवसांपासून अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. हे नगरसेवक आज थेट सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी शहरात परतले आहेत.

advertisement

भाजपचा डाव फसला...

काही दिवसांपूर्वी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांना सोबत घेऊन 'अंबरनाथ विकास आघाडी' स्थापन करत सत्तेचा दावा केला होता. मात्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खेळलेल्या राजकीय खेळीमुळे भाजप-काँग्रेसची ही युती काही क्षणातच कोलमडली. श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवल्याने भाजपच्या हातातून सत्तेच्या चाव्या निसटल्या आहेत. दरम्यान, भाजपसोबत युती केल्याने काँग्रेसने आपल्या १२ नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले. त्यानंतर निलंबित झालेल्या नगरसेवकांपैकी ११ जणांनी भाजपात प्रवेश केला.

advertisement

नगराध्यक्ष भाजपचा, पण सत्ता शिवसेनेची!

या संपूर्ण नाट्यात भाजपची मोठी कोंडी झाली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत सध्या नगराध्यक्ष भाजपचा असला, तरी सभागृहात बहुमत मात्र 'शिवसेना महायुती आघाडी'कडे असणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदावर असूनही भाजपला कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना किंवा कारभार करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

राष्ट्रवादीला जॅकपॉट..

अंबरनाथचे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक उपनगराध्यक्ष होणार आहे. ⁠शिवसेनेच्या पाठिब्यांने अजित पवार गटाचे नगरसेवक सदामामा पाटील हे उपनगराध्यक्ष होणार आहेत.

advertisement

युतीची चर्चा फिस्कटली...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
राजमाता जिजाऊ जयंती! 4 मुलानंतर कन्यारत्न, हत्तीवरून वाटली साखर, इतिहासाची साक्ष
सर्व पहा

रविवारी रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे गट आणि भाजप यांच्यात अंबरनाथमधील युतीबाबत चर्चा सुरू होती. मात्र, कोणताही तोडगा न निघाल्याने युती फिस्कटली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP vs Shiv Sena Ambernath : भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल