TRENDING:

सरकारचा मोठा निर्णय! अडचण दूर झाली, जमिनीसंबंधित हे ११ कागदपत्रे घरबसल्या मिळणार, यादी आली समोर

Last Updated:

Agriculture News :  महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने शासनाने मोठे पाऊल उचलले असून ‘ई-हक्क’ प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Agriculture News
Agriculture News
advertisement

मुंबई : महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने शासनाने मोठे पाऊल उचलले असून ‘ई-हक्क’ प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या नव्या डिजिटल व्यवस्थेमुळे शेतकरी आणि जमीनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, जमीनविषयक अनेक महत्त्वाच्या सेवा आता थेट ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वारस नोंद, इ-करार, गहाणखत किंवा बोजा चढविणे यांसारख्या कामांसाठी वारंवार तलाठी कार्यालयात जाण्याची गरज आता उरलेली नाही.

advertisement

यापूर्वी सातबारा उताऱ्यातील बदल, फेरफार नोंदी किंवा जमिनीशी संबंधित प्रक्रिया करण्यासाठी नागरिकांना तलाठी व महसूल कार्यालयांचे फेरे मारावे लागत होते. कागदपत्रांची पडताळणी, अर्जांची प्रतिक्षा आणि विलंब यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्ची पडत होते. मात्र ई-हक्क प्रणालीमुळे या सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाल्या असून, अर्ज थेट डिजिटल पद्धतीने दाखल करता येत आहेत. महा ई-सेवा केंद्रांमार्फत नागरिक या सुविधांचा लाभ सहजपणे घेऊ शकतात.

advertisement

उद्देश काय?

शासनाचा उद्देश सातबारा उताऱ्यातील अडचणी कमी करणे आणि फेरफार नोंदींचा कालावधी लक्षणीयरीत्या घटवणे हा आहे. ई-हक्क प्रणालीत अर्ज स्वीकारण्यापासून ते अंतिम नोंद होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत करण्यात आली आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन गैरसमज, चुका आणि तक्रारींना आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच, अर्जदाराला आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

advertisement

याचबरोबर शेतकऱ्यांसाठीअॅग्रीस्टॅकयोजनेंतर्गत युनिक फार्मर आयडी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ओळख क्रमांकामुळे भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज, विमा, अनुदान किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेताना विविध उतारे आणि कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. एकाच आयडीच्या आधारे सर्व माहिती उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांचे काम अधिक सुलभ होणार आहे.

advertisement

कोणते कागदपत्रे ऑनलाइन मिळणार?

ई-हक्क प्रणालीअंतर्गत एकूण ११ महत्त्वाच्या जमीनविषयक सेवा ऑनलाईन देण्यात येत आहेत. यामध्ये जमीन खरेदी-विक्रीसाठी फेरफार नोंद (Sale-Purchase Mutation), वारसाहक्क नोंदणी (Inheritance Mutation), कौटुंबिक वाटणी (Partition Mutation), न्यायालयीन आदेशावर आधारित नोंदी, बोजा चढविणे किंवा कमी करणे, गहाणखत नोंद, इ-करार नोंद, संपत्तीचे हस्तांतरण (Transfer of Rights), मृत व्यक्तीचे नाव कमी करणे, एकत्र कुटुंब नोंद कमी करणे, अपाक शेरा कमी करणे तसेच विश्वस्ताचे नाव कमी करणे या सेवांचा समावेश आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
राजमाता जिजाऊ जयंती! 4 मुलानंतर कन्यारत्न, हत्तीवरून वाटली साखर, इतिहासाची साक्ष
सर्व पहा

मराठी बातम्या/कृषी/
सरकारचा मोठा निर्णय! अडचण दूर झाली, जमिनीसंबंधित हे ११ कागदपत्रे घरबसल्या मिळणार, यादी आली समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल