राजमाता जिजाऊ जयंती! चार मुलानंतर कन्यारत्न, हत्तीवरून वाटली साखर, आजही इतिहासाची साक्ष देतोय सिंदखेडचा वाडा
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Rajmata Jijau Jayanti: मुलीच्या जन्माचे एवढ्या उत्साहात स्वागत करणारे लखोजी राजे खरोखर दूरदृष्टी असलेले राजे होते.
जालना: स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारी रोजी जयंती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे म्हाळसाबाईंच्या पोटी जिजाऊ यांनी जन्म घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या सिंदखेड राजा येथे त्यांचे आजोबा लखोजी जाधव यांचा भव्य राजवाडा आजही आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म आणि त्यांचे सिंदखेड येथील वास्तव्य याबाबात इतिहास अभ्यासक विनोद ठाकरे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली.
लखोजीराजे जाधव यांच्या राजवाड्यात नैऋत्य दिशेला असलेल्या म्हाळसामहलात जिजाऊ यांचा जन्म झाला. जन्म झाला तेव्हा सकाळी सहा वाजता सूर्योदयाची वेळ होती. 12 जानेवारी 1598 ही त्यांची जन्मतारीख. आपण मुलगी ही धनाची पेटी आहे असं म्हणतो. या उक्तीचा तंतोतंत अनुभव जिजाऊ जन्मावेळी झाला. कारण जिथे जिजाऊ जन्मल्या त्या खोलीच्या बरोबर खाली तिजोरी होती, असं ठाकरे सांगतात.
advertisement
चार मुलानंतर कन्यारत्न
चार मुलानंतर जेव्हा जिजाऊ यांच्या रूपात लखोजी जाधवांना कन्या झाली, तेव्हा त्यांनी हत्तीवरून साखर पान वाटले होते. त्या काळात मुलीच्या जन्माचे एवढ्या उत्साहात स्वागत करणारे लखोजी राजे खरोखर दूरदृष्टी असलेले राजे होते.
advertisement
लखोजी जाधव यांच्या याच राजवाड्यात जिजाऊ वाढल्या, लहानाच्या मोठ्या झाल्या. घोड्यावर बसणे, शस्त्रे चालवणे, युद्धकला, विद्या, राजनीती आदीचे शिक्षण घेतले. यावरून स्त्री शिक्षण यांविषयी लखोजी यांची दूरदृष्टी लक्षात येते, असं इतिहास अभ्यासक विनोद ठाकरे यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 9:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
राजमाता जिजाऊ जयंती! चार मुलानंतर कन्यारत्न, हत्तीवरून वाटली साखर, आजही इतिहासाची साक्ष देतोय सिंदखेडचा वाडा









