4 दिग्दर्शक, 19 कॅमेरामन अन् 30 कलाकार... 24 तासात तयार झाला सिनेमा, ठरला सुपरहिट
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
South Film : साउथ इंडस्ट्रीच्या या सिनेमामध्ये चक्क 14 दिग्दर्शक, 19 कॅमेरामन आणि 30 पेक्षा जास्त मुख्य अभिनेत्यांनी काम केले होते. हा सिनेमा 24 तासात तयार झाला होता.
advertisement
1/8

साउथचे सिनेमे हे कायमच इंडियन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या कथा या त्यांच्या मुळ संस्कृतीचा भाग असतो आणि त्या अस्सल मातीतल्या असतात.
advertisement
2/8
साउथचा 'सुयंमवरम' हा सिनेमा 1999 मध्ये प्रदर्शित झाला.खरंतर या सिनेमाचा रेकॉर्ड असा आहे की, हा सिनेमा बनवायला फक्त 24 तास लागले होते. सिनेमाचे निर्माता आणि लेखन गिरिधारीलाल नागपाल यांचे होते. विकीपिडियाच्या माहितीनूसार हा सिनेमा तमिळ भाषेतील कॉमिक सिनेमा होता. 25 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने 50 कोटी कमाई केली होती
advertisement
3/8
हा इतिहास म्हणावा लागेल साउथ इंडस्ट्रीचा की, या सिनेमामध्ये चक्क 14 दिग्दर्शक, 19 कॅमेरामन आणि 30 पेक्षा जास्त मुख्य अभिनेत्यांनी काम केले होते.
advertisement
4/8
नागपाल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा एका दिवसात पूर्ण शूटींग करुन तमिळ इंडस्ट्रीमध्ये एक रेकॉर्ड केले होते. या सिनेमामधून तमिळ मधील मुख्य दिग्गज कलाकारांना एकाच सिनेमात ,एकाच पडद्यावर दाखवायचे काम पहिल्यांदा यांनी केले
advertisement
5/8
या सिनेमात असे दाखवले होते की विजयकुमार आणि त्यांचा पत्नी मंजुला विजयकुमार हे मोठ्या कुटूंबातून असतात. ज्यात त्यांचे मीन मुलगे म्हणजेच सत्यराज, प्रभु देवा आणि अब्बास यांना दाखवले आहे.
advertisement
6/8
सोबतच त्यांच्या सहा मुली असतात उर्वशी (रंभा), ईश्वरी (रोजा), उमा (कस्तूरी), ऐश्वर्या (महेश्वरी), हेमा (प्रीता विजयकुमार) आणि एझिलारसी (सुवलक्ष्मी). त्यात पार्थिबन हा कुटूंबाचा ईमानदार नोकर असतो आणि नेपोलियन हा त्यांचा फॅमिली डॉक्टर असतो.
advertisement
7/8
सिनेमाच्या सुरुवातीला कुसेलेनचा 60 वा वाढदिवस संपन्न होत असतो असे दाखवले आहे. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. डॉक्टर कुटूंबाला सांगतात की, ते वाचू शकत नाहीत.
advertisement
8/8
शेवटच्या क्षणी कुसेलेन एक इच्छा व्यक्त करतात की, "मला माझ्या मृत्यु अगोदर माझ्या सगळ्या मुलांची लग्न पाहायची आहेत." तेव्हा त्यांची मुलं हो म्हणून एक जाहिरात काढतात. जो आमच्याशी लग्न करेल त्याला 1 कोटी रुपये बक्षिस दिले जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
4 दिग्दर्शक, 19 कॅमेरामन अन् 30 कलाकार... 24 तासात तयार झाला सिनेमा, ठरला सुपरहिट