'एव्हरग्रीन' मृणाल कुलकर्णीला सुनबाई कोणत्या नावाने हाक मारते? नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mrinal Kulkarni Birthday : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या सूनबाई शिवानी रांगोळेने त्यांच्यासाठी खास पोस्ट केली होती. मृणाल यांनीही गोड रिप्लाय दिला.
advertisement
1/6

मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या दमदार अभिनयाने, निखळ मराठमोळ्या सौंदर्याने आणि मृदू स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा आज वाढदिवस. पुण्यात जन्मलेल्या मृणाल यांचा साहित्यिक गो.नी. दांडेकर यांच्याशी खास नातं आहे. ते त्यांचे आजोबा. त्यांचे वडील डॉ. विजय देव आणि आई वीणा देव हे दोघेही मराठीतील प्रसिद्ध लेखक आहेत.
advertisement
2/6
आज वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णींवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. याच दिवशी काही वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर एका खास व्यक्तीने त्यांच्यासाठी केलेली पोस्ट विशेष चर्चेत आली होती, ज्यामुळे त्यांच्या नात्यातील गोडवा पुन्हा एकदा समोर आला.
advertisement
3/6
मृणाल कुलकर्णींसाठी ही खास आणि हृदयस्पर्शी पोस्ट केली होती त्यांच्याच सूनबाईने, म्हणजेच अभिनेत्री शिवानी रांगोळेने. शिवानीने या पोस्टमध्ये आपल्या सासूबाईंचा उल्लेख 'ताई' असा केला होता, ज्यामुळे त्यांच्या नात्यातील अनौपचारिकपणा आणि मैत्री दिसून येते.
advertisement
4/6
शिवानीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई! माझी मैत्रीण, विश्वासू असण्याबद्दल आणि नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद! प्रत्येकाबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याची आणि त्यांना आनंदी ठेवण्याची तुझी पद्धत, आणि अशावेळी स्वतः ऊर्जा टिकवून ठेवणं हे नक्कीच प्रेरणादायी आहे! तुझे असे अनेक वाढदिवस प्रेम आणि शांतीने परिपूर्ण राहोत!" शिवानीने मृणाल कुलकर्णींसोबतचा एक सुंदर फोटोही या पोस्टसोबत शेअर केला होता. या पोस्टमधून शिवानी आणि मृणाल यांच्यातील सासू-सुनेच्या नात्यापलीकडचं मैत्रीचं नातं स्पष्ट दिसतं.
advertisement
5/6
सूनबाई शिवानीने दिलेल्या या प्रेमळ शुभेच्छांवर मृणाल कुलकर्णींनीही तितकाच गोड रिप्लाय दिला होता. त्यांनी कमेंटमध्ये लिहिलं होतं, "Awwwwwwww!! Love infinite" आणि पुढे हार्ट इमोजीही वापरला होता. यातून त्यांच्यातील निस्सीम प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर दिसून येतो.
advertisement
6/6
मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा, अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी २०२२ च्या मे महिन्यात लग्न केलं. त्यांच्या लग्नानंतरही शिवानी आणि मृणाल यांच्यातील हे सुंदर बॉण्डिंग सोशल मीडियावर अनेकदा दिसून आलं आहे, जे अनेकांसाठी आदर्श ठरलं आहे. मृणाल कुलकर्णींनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'एव्हरग्रीन' अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मृणाल कुलकर्णींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'एव्हरग्रीन' मृणाल कुलकर्णीला सुनबाई कोणत्या नावाने हाक मारते? नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का!