Anju Krishna Arrested: ग्लॅमरच्या आड अंमली पदार्थांचं रॅकेट! कोण आहे अंजू कृष्णा, जिला पडल्या बेड्या? पोलिसांनी सापळ्यात अडकवलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Anju Krishna Arrested: आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालणारी ३१ वर्षीय अभिनेत्री अंजू कृष्णा हिला चेन्नई पोलिसांनी अमली पदार्थांच्या प्रकरणी अटक केली आहे.
advertisement
1/9

तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीला हादरा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालणारी ३१ वर्षीय अभिनेत्री अंजू कृष्णा हिला चेन्नई पोलिसांनी अंमली पदार्थांच्या प्रकरणी अटक केली आहे.
advertisement
2/9
गुरुवारी चेन्नईतील वलसरवक्कम परिसरात अँटी-नारकोटिक्स इंटेलिजेंस युनिटने (ANIU) टाकलेल्या छाप्यामध्ये ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेने साऊथ इंडस्ट्रीत मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
3/9
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला वलसरवक्कममधील एका फ्लॅटमध्ये अंमली पदार्थांची पार्टी सुरू असल्याची टीप मिळाली होती.
advertisement
4/9
पथकाने तिथे छापा टाकला तेव्हा अभिनेत्री अंजू कृष्णा तिथे उपस्थित होती. पोलिसांनी तिथून केवळ अमली पदार्थच जप्त केले नाहीत, तर अंजूसोबत चक्क सहाय्यक दिग्दर्शिका विंसी निवेधा हिच्यासह सात जणांना ताब्यात घेतलं आहे.
advertisement
5/9
पोलिसांनी या कारवाईत ६ ग्रॅम मेथामफेटामाइन, ७ ग्रॅम ओजी गांजा, १५ ग्रॅम भांग, एक एलएसडी स्टॅम्प, ९ महागडे मोबाईल फोन्स असे प्रतिबंधित पदार्थ जप्त केले आहेत.
advertisement
6/9
अंजू कृष्णा हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक परिचित नाव आहे. तिने प्रामुख्याने तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'आकाशम कडन्न', 'आरो' आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ओम वेल्लिमालई' (२०२३) या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं.
advertisement
7/9
सोशल मीडियावरही अंजूचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे २४ हजार फॉलोअर्स असून, ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटोशूट आणि ट्रॅव्हल डायरीज शेअर करत असते.
advertisement
8/9
अंजूच्या अटकेमुळे सिनेसृष्टीतील अंमली पदार्थांचं कनेक्शन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी कार्तिक राजा, यशवंत, श्रीराम आणि व्यंकटेश कुमार यांनाही अटक केली आहे.
advertisement
9/9
अटक करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक दिग्दर्शिकेचा समावेश असल्याने हे रॅकेट थेट फिल्म सेटपर्यंत पोहोचलं होतं का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Anju Krishna Arrested: ग्लॅमरच्या आड अंमली पदार्थांचं रॅकेट! कोण आहे अंजू कृष्णा, जिला पडल्या बेड्या? पोलिसांनी सापळ्यात अडकवलं