TRENDING:

कोण आहे मोहम्मद रोहिल्ला, ज्याने सैफ अली खानवर केले सपासप वार? अटकेनंतर पोलिसांनी सांगितली पूर्ण ओळख

Last Updated:
सैफ अली खान सध्या चांगलंच गाजतंय. १६ जानेवारीच्या मध्यरात्री सैफवर ६ वेळा चाकूने हल्ला करण्यात आला, त्यापैकी दोन अत्यंत प्राणघातक होते.
advertisement
1/11
कोण आहे मोहम्मद रोहिल्ला, ज्याने सैफ अली खानवर केले सपासप वार?
सैफ अली खान सध्या चांगलंच गाजतंय. १६ जानेवारीच्या मध्यरात्री सैफवर ६ वेळा चाकूने हल्ला करण्यात आला, त्यापैकी दोन अत्यंत प्राणघातक होते.
advertisement
2/11
उपचारानंतर डॉक्टरांनी सांगितले की, सैफच्या मणक्यात घातलेला चाकू जर २ मिमी आणखी खोल गेला असता तर परिस्थिती खूप गंभीर झाली असती.
advertisement
3/11
करीना कपूरने तिच्या निवेदनात म्हटले आहे की, 'हल्लेखोराने तिच्या दागिन्यांना हातही लावला नाही आणि सैफ अली खानवर हल्ला करताना तो खूप आक्रमक होता.' आज १९ जानेवारीला मुख्य संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले.
advertisement
4/11
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने स्वतःची ओळख विजय दास अशी दिली, मात्र सखोल तपास आणि चौकशीत त्याचे खरे नाव शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर असल्याचे उघड झाले.
advertisement
5/11
ETimes च्या रिपोर्टनुसार, DCP दीक्षित गेडाम यांनी आरोपीच्या अटकेनंतर सांगितले की, “आरोपीचे नाव शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर असे आहे, तो ३० वर्षांचा आहे. ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट येथून त्याला अटक करण्यात आली आहे.”
advertisement
6/11
डीसीपींनी पुढे खुलासा केला की आरोपी बांगलादेशचा असून त्याने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता म्हणून तो वेगवेगळी नावे वापरत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो मुंबईत राहत होता.
advertisement
7/11
मुंबईला लागून असलेल्या भागातही त्याने काही काळ वास्तव्य केले. त्याचे लग्न झालेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून तो हाऊसकीपिंग एजन्सीत काम करत असला तरीही तो बेरोजगार होता.
advertisement
8/11
पोलिसांनी काही पुरावे गोळा केले आहेत, ज्यावरून त्यांना समजले की आरोपी बांगलादेशचा आहे. डीसीपींनी पुढे दावा केला की मोहम्मद रोहिल्लाकडे कोणतेही वैध भारतीय दस्तऐवज नव्हते.
advertisement
9/11
सध्या त्याने स्वतःचे नाव विजय दास ठेवले होते. ५-६ महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला होता. तो मुंबईत आला, त्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या भागात राहू लागला.
advertisement
10/11
पोलिसांनी त्यांच्या जबाबात असेही म्हटले आहे की, आरोपी चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता, परंतु ते सैफ अली खानचे घर असल्याचे त्यांना माहीत नव्हते.
advertisement
11/11
दरम्यान, सैफ अली खानची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्यांना एका दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोण आहे मोहम्मद रोहिल्ला, ज्याने सैफ अली खानवर केले सपासप वार? अटकेनंतर पोलिसांनी सांगितली पूर्ण ओळख
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल