Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत पारा घसरला, हवामानात मोठे बदल, शनिवारी पुन्हा अलर्ट
- Reported by:
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, शहापूर, बदलापूर परिसरातील 20 डिसेंबरचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यभरात थंडीचा कडाका कायम असून काही ठिकाणी पारा पुन्हा घसरला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात तापमान 20 अंशांच्या खाली असून गारठा वाढला आहे. 20 डिसेंबर रोजी कल्याण-डोंबिवलीसह बदलापूर, मुरबाड आणि शहापुरातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
डिसेंबर महिन्यातील नेहमीच्या हवामानाप्रमाणे कल्याणमध्ये तापमानात घट होऊन पार पुन्हा 20 अंशांच्या खाली येण्याची शक्यता आहे, त्यामुळे सकाळच्या वेळी थंडी जाणवेल. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस असेल. कल्याणमध्ये आज दिवसा हवामान उबदार आणि उष्ण असेल, तर रात्री थंडी जाणवेल. हवामान साधारणपणे स्थिर आहे आणि थंडीच्या लाटेमुळे तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
डोंबिवलीमध्ये थंडी जोर कायम आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज गारठा अधिक जाणवेल. किमान तापमान 12 अंश सेल्सिअससपर्यंत घससरण्याचा अंदाज आहे. तर कमाल तापमान 24 अंशांवर राहील. हवामान कोरडे आणि सूर्यप्रकित असेल. तर रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका जाणवेल.
advertisement
4/5
गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीतील हवामानाचा पॅटर्न बदलला असून ग्रामीण भागातील थंडीचा कडाका वाढला आहे. शुक्रवारी दिवसभर या भागात उन्हाचे चटके तर रात्री थंडी अनुभवायला मिळाली. आज कमाल तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 10 ते 11 अंश सेल्सिअस असेल.
advertisement
5/5
बदलापूर परिसरात थंडीचा प्रभाव वाढत आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज तापमानाचा पारा घसरला असून किमान तापमान सुमारे 12 अंश आणि कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस असेल. तर मुरबाड, शहापूर शहरात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आज गारठा वाढलेला जाणवेल. कमाल तापमान 30 अंश आणि किमान तापमान 14 ते 17 अंश सेल्सिअस पर्यंत घसरू शकते. त्यामुळे हवेत गारठा जाणवेल. हवामान स्वच्छ व सूर्यप्रकाशित राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत पारा घसरला, हवामानात मोठे बदल, शनिवारी पुन्हा अलर्ट