पनवेलमध्ये हल्ला झालेली Jannat Zubair TV ची सर्वांत महागडी हिरोईन, कमाईमध्ये श्वेता तिवारीलाही टाकलं मागे, संपत्तीचा आकडा शॉकिंग
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jannat Zubair attacked: जन्नत ही हिंदी मालिका विश्वातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असून तिने श्वेता तिवारी, निया शर्मा, हिना खान यांसारख्या अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे.
advertisement
1/8

काही तासांपूर्वीच हिंदी मालिका विश्वातून अतिशय खळबळजनक बातमी समोर आली. संपूर्ण देशात लोकप्रिय असलेल्या टीव्ही अभिनेत्रीवर आणि तिच्या भावावर पनवेलमध्ये अचानक हल्ला झाला आणि संपूर्ण देशाला धक्का बसला. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून जन्नत झुबैर आहे.
advertisement
2/8
गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर एक बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे ती म्हणजे, जन्नत आणि तिचा भाऊ अयान झुबैर यांच्यावर पनवेलमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे.
advertisement
3/8
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जन्नत आपल्या भावासह काही कामानिमित्त पनवेलला गेली होती. तिथे त्यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात दोन्ही भावंड जखमी झाले आहेत.
advertisement
4/8
पोस्टमधील माहितीनुसार, 15 मार्च रोजी त्यांच्यावर हा हल्ला झाला. स्वतः जन्नतच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या बातमीला दुजोरा दिला आहे.
advertisement
5/8
एकीकडे या हल्ल्याच्या बातम्यांनी चाहते चिंतेत असतानाच, जन्नतच्या संपत्तीबाबत सोशल मीडियावर विचारणा केली जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जन्नत ही हिंदी मालिका विश्वातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असून तिने श्वेता तिवारी, निया शर्मा, हिना खान यांसारख्या अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे.
advertisement
6/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जन्नत झुबैरची एकूण संपत्ती सुमारे २५० कोटी रुपये आहे. तर श्वेता तिवारीची संपत्ती ८१ कोटी, हिना खान ५२ कोटी आणि निया शर्माची संपत्ती ७० कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
7/8
सोशल मीडियावरही जन्नतचे ५० दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असून ती टीव्ही मालिका, ब्रँड एंडोर्समेंट, सोशल मीडिया आणि म्युझिक व्हिडिओंच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावते. २१ व्या वर्षी तिने मुंबईत स्वतःचं हक्काचं आलिशान घर खरेदी करून सर्वांना थक्क केलं होतं.
advertisement
8/8
'फुलवा' या मालिकेतून बालकलाकार म्हणून घराघरात पोहोचलेली जन्नत आज एक ग्लोबल आयकॉन बनली आहे. राणी मुखर्जीच्या 'हिचकी' चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. सध्या ती 'लाफ्टर शेफ ३' या रिॲलिटी शोमध्ये आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पनवेलमध्ये हल्ला झालेली Jannat Zubair TV ची सर्वांत महागडी हिरोईन, कमाईमध्ये श्वेता तिवारीलाही टाकलं मागे, संपत्तीचा आकडा शॉकिंग