Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, रविवारी हवामानात मोठे बदल, IMD चा अलर्ट
- Reported by:
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: सन 2026 मधील पहिल्याच रविवारी कल्याण-डोंबिवलीसह परिसरासाठी हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून राज्यातील हवामानात बदल जाणवत आहेत. मुंबईसह काही भागात हवामान ढगाळ झालं असून काही ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. तर थंडीचा कडाका देखील कायम आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात आज हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील रविवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
उत्तर भारतातून येणाऱ्या थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवत आहे. रविवारी कल्याणमध्ये सकाळी थंडी तर दिवसा किंचीत उष्णता जाणवणार आहे. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस असेल. शनिवार प्रमाणे आज हवामान कोरडे राहणार आहे.
advertisement
3/5
डोंबिवली शहरात आज अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तापमान 33 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते, पण आज पुन्हा थंडीचा कडाका जाणवेल. रविवारी वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता (AQI) खालावण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात 4 जानेवारी रोजी सकाळी थंडी तर दिवसा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. बदलत्या वातावरणानुसार हवामानातील प्रदूषण (AQI) वाढल्याने काही दिवस नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये आज हवामान साधारणपणे स्वच्छ आणि थंड राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 15 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस पर्यंत असू शकते. दिवसा हवामान ऊबदार आणि रात्री थंडावा जाणवेल. मुरबाड, शहापूर तालुक्यातील किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर कमाल 34 अंश सेल्सिअस राहील. हवामानातील बदलांमुळे आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, रविवारी हवामानात मोठे बदल, IMD चा अलर्ट