TRENDING:

Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, हवामान मोठे बदल, शुक्रवारी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ठाणे-मुंबईच्या हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवलीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, हवामान मोठे बदल, शुक्रवारी अलर्ट
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. सर्वत्र थंडीचा कडाका असतानाच मुंबईसह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळाली. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली आणि परिसरातील 2 जानेवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे मुंबई-ठाण्यासह कल्याण परिसरात देखील गारठा वाढला आहे. 2 जानेवारी रोजी कल्याणमध्ये हवामान सूर्यप्रकाशित आणि स्वच्छ असेल. कमाल तापमान 32 तर किमान 19 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
3/5
डोंबिवली शहरात देखील थंडीचा कडाका कायम असून हवामान सुखद आणि कोरडे राहील. किमान तापमान 16 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील. सकाळी आणि रात्री गारवा जाणवेल, तर दिवसा ऊन आणि उबदारपणा असेल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात 2 जानेवारीला सकाळी दाट धुके आणि थंडी जाणवेल. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस असेल. ज्यामुळे हवामान कोरडे व आल्हाददायक असल्याने दिवसा उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
शुक्रवारी बदलापूर शहरात हवामान कोरडे आणि थंड राहील. किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील. दिवसा हवामान आल्हाददायक असेल. तर मुरबाड शहापूर तालुक्यात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील. सततच्या हवामान बदलांमुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, हवामान मोठे बदल, शुक्रवारी अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल