Weather Alert: ठाण्यात वारं फिरलं, कल्याण-डोंबिवलीला अलर्ट, 19 फेब्रुवारीला हवामान कसं?
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: मुंबई-ठाण्यासह कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 19 फेब्रुवारीचं कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसतात. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसांत उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. विशेषतः मुंबई आणि कोकण किनारपट्टीत काही दिवसांपासून स्थिर असलेल्या हवामानात बदल होऊन पारा चांगलाच चढत आहे. 19 फेब्रुवारीला वाढत्या कमाल तापमानामुळे उष्णतेच्या झळा अधिक जाणवतील. ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली शहरातील हवामान कसे असेल जाणून घेऊयात?
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यातील हवामान मुख्यत्वे कोरडे, स्वच्छ आणि ऊबदार राहील. कमाल तापमान स्थिर असून 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहील. दिवसभरात हलके वारे वाहतील आणि उकाडा अधिक जाणवेल. दुपारी बाहेर पडताना लहान मुलांसह वृद्धांची काळजी घ्यावी.
advertisement
3/5
कल्याण-डोंबिवलीत हवामान कोरडे, उष्ण आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमानात बदल होऊन, कमाल तापमान 33-34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दिवसा उष्णता वाढणार असल्याने नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान उष्ण व दमट असून, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस राहील. दुपारी उष्णतेत वाढ होऊन उन्हाचा कडाका अधिक असेल. वाढत्या तापमानामुळे फळबागांमध्ये पाण्याचे नियोजन करावे. नागरिकांनी कडक उन्हामुळे दुपारी बाहेर पडताना काळजी घ्यावी.
advertisement
5/5
बदलापूरमधील हवामान उष्ण, स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित असेल. तापमानात बुधवारपेक्षा किंचित बदल होऊन कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान उष्ण, कोरडे आणि निरभ्र राहील. कमाल तापमान 35-36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22-23 अंश सेल्सिअस असेल. फेब्रुवारीच्या मध्यावर उष्णता वाढल्यामुळे दुपारी कडक ऊन जाणवेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: ठाण्यात वारं फिरलं, कल्याण-डोंबिवलीला अलर्ट, 19 फेब्रुवारीला हवामान कसं?