TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : काय टेन्शन देताय तुम्ही! कॅप्टन्सीचा टास्क पाहूनच राकेश बापट घाबरला

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : कॅप्टन्सीचे आजवर अनेक टास्क झाले आहेत. पण आताचा टास्क असा आहे, जो पाहून बिग बॉस मराठीच्या घरातील सगळ्या सदस्यांना टेन्शन आलं आहे. विशेषत: राकेश बापट तर खूपच घाबरलेला दिसतो आहे.
advertisement
1/9
BBM 6 : काय टेन्शन देताय तुम्ही! कॅप्टन्सीचा टास्क पाहूनच राकेश बापट घाबरला
Bigg Boss Marathi 6 च्या घरात कॅप्टन होण्यासाठी प्रत्येक सदस्याची चढाओढ सुरू आहे. कॅप्टन्सीसाठी टास्क असतात. आजवर असे बरेच टास्क झाले आहेत. पण आताचा टास्क असा आहे, जो पाहून राकेश बापट घाबरला आहे. त्याला टेन्शन आलं आहे.
advertisement
2/9
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात सदस्य कॅप्टन्सीचा टास्क खेळताना दिसत आहे. यावेळी चावीने कुलूप उघडण्याचा टास्क आहे.
advertisement
3/9
तुम्ही पाहू शकता एका मोठ्या चावीला लोखंडी साखळीत बांधण्यात आलं आहे आणि या साखळ्यांना कुलूपं लावण्यात आली आहे. या कुलुपांची चावी शोधून ती कुलूपं उघडायची आहेत.
advertisement
4/9
2-2 सदस्यांना बेडीत बांधण्यात आलं आहे आणि अशाच बेडीत त्यांना धावपळ करत चावी शोधायची आहे. घरातील सदस्यांची चावी शोधण्यासाठी पळापळ सुरू आहे.
advertisement
5/9
हॉल, बेडरूम, किचन, अगदी बाथरूममध्येही शोधाशोध सुरू आहे. बिग बॉसचा हा टास्क अनेक प्रेक्षकांना आवडला आहे. पण घरातील सदस्य मात्र चांगलेच हादरले आहेत.
advertisement
6/9
कारण जितका वाटतो तितका हा टास्क सोपा नाही तर घरात वेगवेगळ्या ठिकाणी चाव्या ठेवल्या आहेत. त्या शोधायच्या आहेत आणि त्याने हे कुलूप खोलायचं आहे. जर शोधलेल्या चावीने कुलूप उघडलं तर ठिक आणि नाही उघडलं तर तो सदस्य बाद.
advertisement
7/9
प्रोमोच्या शेवटी तुम्ही पाहू शकता राकेश बापट तर खूपच घाबरलेला दिसतो आहे. काय टेन्शन देता तुम्ही, असं तो म्हणताना येऊ येतं.
advertisement
8/9
दरम्यान हा प्रोमो पाहिल्यावर अनेक नेटिझन्सनी प्रभू शेळके किंवा तन्वी कोतले कॅप्टन झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
advertisement
9/9
आता नेमका कॅप्टन कोण हे एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. पण तुम्हाला काय वाटतं, कोण कॅप्टन झालं असावं, तुमचा अंदाज काय? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : काय टेन्शन देताय तुम्ही! कॅप्टन्सीचा टास्क पाहूनच राकेश बापट घाबरला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल