Weather Alert In Marathi : पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीत उन्हाचा पारा चढणार, हवामान खात्याचा अलर्ट
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Mohan Najan
Last Updated:
दुपारच्या वेळी कडक ऊन आणि काही भागांत दमटपणा जाणवण्याची शक्यता असून सोमवार 23 फेब्रुवारी ठाण्यासह कल्याण डोंबिवली भागातील हवामानाची स्थिती काय असेल बघुयात.
advertisement
1/5

महाराष्ट्रातील हवामानात गेल्या दोन दिवसांपासून चढउतार होताना दिसत आहेत.. फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात राज्यातून थंडीने लवकरच माघार घेतली असून आता उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ऋतुबदलामुळे उष्णता वाढली अधिकच वाढली आहे. मुंबईत कोरडे आणि उष्ण हवामान असून पारा 36 अंशावर पोहचला आहे. यामुळे दुपारच्या वेळी कडक ऊन आणि काही भागांत दमटपणा जाणवण्याची शक्यता असून सोमवार 23 फेब्रुवारी ठाण्यासह कल्याण डोंबिवली भागातील हवामानाची स्थिती काय असेल बघुयात.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यातील हवामान कोरडे, अंशतः ढगाळ आणि उष्ण राहील. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान स्थिर असून 23 अंश सेल्सिअस असेल. रात्रीच्या वेळी वातावरण सुखावह असेल,तर दिवसा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 4 या वेळेत थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे.
advertisement
3/5
कल्याण-डोंबिवलीत हवामान उष्ण आणि कोरडे राहील. कमाल आणि किमान तापमान वाढ होऊन 38 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असेल.उन्हाचा चटका वाढत असल्याने दुपारी शक्यतो बाहेर पडणे टाळावे भरपूर पाणी प्या आणि कडक उन्हापासून स्वतःचे संरक्षण करा.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान उष्ण, कोरडे आणि सूर्यप्रकाशित राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 22 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस राहील. पुढील काही दिवस कडक ऊन असल्याने दुपारच्या वेळी उन्हाचे चटके अधिक जाणवतील,त्यामुळे या दिवसात नरम आणि कॉटनच्या कपड्यांचा वापर करावा .
advertisement
5/5
बदलापूरमधील हवामान उष्ण आणि दमट राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असेल. तसेच मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील हवामान एक अंकी असल्याने स्वच्छ, कोरडे आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 33-36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19-22 अंश सेल्सिअस असेल. दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची किंवा अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, हवामान उबदार आणि कडक असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert In Marathi : पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीत उन्हाचा पारा चढणार, हवामान खात्याचा अलर्ट