TRENDING:

9 वर्षांपूर्वीच एंगेजमेंट, विजय देवरकोंडा नाही हा अभिनेता होणार होता रश्मिका मंदानाचा नवरा, वयाने 13 वर्षांनी मोठा

Last Updated:
Rashmik Mandana : अभिनेत्री रश्मिका मंदानाची अभिनेता विजय देवरकोंडासोबत लग्नाची चर्चा सुरू आहे. पण 9 वर्षांआधी अभिनेत्रीने वेगळ्या साऊथ स्टारसोबत एंगेजमेंट केली होती अशी माहिती आहे.
advertisement
1/5
9 वर्षांपूर्वी एंगेजमेंट, विजय नाही हा अभिनेता होणार होता रश्मिका मंदानाचा नवरा
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा दोघंही सध्या लग्नामुळे चर्चेतआहेत. रिपोर्टनुसार  3 ऑक्टोबर 2025 रोजी हैदराबादध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांनी गुपचूप साखरपुडा केला आणि आता 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचं लग्न होणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
2/5
पण रिपोर्टनुसार रश्मिकाचं हे पहिलं नाही तर दुसरं रिलेशन आहे. म्हणजे 9 वर्षांपूर्वी 2017 सालीही रश्मिकाचा साखरपुडा झाला होता. तिचा होणारा नवरा विजय नाही तर दुसराच साऊथ हिरो होता.
advertisement
3/5
माहितीनुसार रश्मिकाने वयाच्या 21 व्या वर्षी वयाने 13 वर्षांनी मोठ्या साऊथ हिरोसोबत एंगेजमेंट केली होती.  हा साऊथ अभिनेता म्हणजे रक्षित शेट्टी.
advertisement
4/5
रक्षित शेट्टी ज्याने त्यावेळी अल्पावधीतच सहा सुपरहिट चित्रपट दिले होते. रश्मिका आणि रक्षितच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर आहेत.
advertisement
5/5
पण रश्मिका आणि रक्षित यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यांच्या काही जुळत नव्हतं, म्हणून त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असं वृत्त त्यावेळी आलं होतं. आता त्यानंतर 9 वर्षांनी रश्मिका पुन्हा एकदा नात्याक अडकणार असल्याचं म्हटलं जातं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
9 वर्षांपूर्वीच एंगेजमेंट, विजय देवरकोंडा नाही हा अभिनेता होणार होता रश्मिका मंदानाचा नवरा, वयाने 13 वर्षांनी मोठा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल