TRENDING:

Ro-Ro Ferry : कोकणवारी झाली अधिक सोपी! मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो सेवा लवकरच सुरु; तिकीट किती असणार?

Last Updated:
Mumbai-Vijaydurg Ro Ro Ferry: मुंबई ते विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. या जलमार्गामुळे सिंधुदुर्गचा प्रवास पाच ते सहा तासांत पूर्ण होणार असून प्रवाशांना स्वतःची वाहनंही सोबत नेता येणार आहेत.
advertisement
1/6
मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो सेवा लवकरच सुरु; तिकीट किती असणार?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईहून कोकणात जाणे आता अधिक सोपे होणार आहे. नेमकी प्रवाशांना कोणती सुविधा उपलब्ध होणार आहे त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
advertisement
2/6
मुंबईत ते विजयदुर्ग दरम्यान रो-रो फेरी सेवा लवकरच सुरू होणार आहे. या सेवेमुळे मुंबई ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवास केवळ पाच ते सहा तासांत पूर्ण होऊ शकतो.
advertisement
3/6
सध्या रस्त्याने हा प्रवास 10 ते 12 तासांचा आहे विशेषतहा सुट्टी किंवा सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडीमुळे वेळ आणखी वाढतो.
advertisement
4/6
ही सेवा ऑगस्ट 2025 मध्ये सेवा सुरू करण्याची घोषणा झाली होती मात्र आता ही सेवा मार्च 2026 पर्यंत सर्व काम पूर्ण करून एप्रिल 2026 मध्ये सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
advertisement
5/6
मुंबईतील भाऊचा धक्का येथून ही फेरी थेट विजयदुर्गपर्यंत धावेल. जेट्टीचे रूपांतर रो-रो जेट्टीमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊन प्रवास करू शकतील.
advertisement
6/6
तिकिट दर अद्याप जाहीर झाले नाहीत. मात्र प्राथमिक अंदाजानुसार प्रवासी तिकिट 800 ते 1200 रुपये असू शकते. दुचाकीसाठी सुमारे 1000 रुपये आणि चारचाकीसाठी 4500 ते 6000 रुपये दर असू शकतात. या सेवेमुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
Ro-Ro Ferry : कोकणवारी झाली अधिक सोपी! मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो सेवा लवकरच सुरु; तिकीट किती असणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल