Gold Silver : सोनं 'कॅरेट'मध्ये अन् चांदी 'किलो'मध्ये असं का मोजतात? किंमती धातूंच्या मोजमापाचा हा फंडा नक्की काय आहे?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी विचार केलाय का की, दोन्ही मौल्यवान धातू आहेत आणि दोघांपासूनही दागिने बनवले जातात. त्यांच्या शुद्धतेची आणि वजनाची मोजमापं इतकी वेगळी का आहेत?
advertisement
1/9

भारतीय घरांमध्ये सण-समारंभ असो किंवा गुंतवणुकीचा विचार, सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे सोनं आणि चांदीचं. आपण सोनं खरेदी करायला गेलो की "किती कॅरेटचं आहे?" असं विचारतो, तर चांदी घेताना मात्र "किलोचा भाव काय?" किंवा "टंच किती आहे?" अशी चौकशी करतो.
advertisement
2/9
कधी विचार केलाय का की, दोन्ही मौल्यवान धातू आहेत आणि दोघांपासूनही दागिने बनवले जातात. त्यांच्या शुद्धतेची आणि वजनाची मोजमापं इतकी वेगळी का आहेत? सोनं कधी किलोमध्ये का मोजलं जात नाही किंवा चांदी कॅरेटमध्ये का नसते? यामागे केवळ परंपरा नाही, तर जागतिक व्यापार आणि विज्ञानाचा मोठा हात आहे. चला तर मग, सोनं-चांदीच्या या गणितामागचं खरं कारण सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
3/9
सोन्यासाठी 'कॅरेट' सिस्टीमच का?सोन्याची शुद्धता 24 भागांच्या स्केलवर मोजली जाते. 24 कॅरेट सोनं म्हणजे 99.9% शुद्ध मानलं जातं. पण इथे एक गोम आहे. शुद्ध सोनं हे अत्यंत मऊ असतं. त्यापासून दागिने बनवणं अशक्य असतं कारण ते सहज वाकतात. दागिने टिकण्यासाठी त्यात तांबे, जस्त किंवा चांदी मिसळावी लागते.
advertisement
4/9
कॅरेटचा अर्थकॅरेट प्रणाली आपल्याला हे सांगते की, एकूण 24 भागांपैकी 'शुद्ध सोने' किती आहे. उदा. 22 कॅरेट सोन्यात 22 भाग सोनं आणि 2 भाग इतर धातू असतात (91.68% शुद्धता). 18 कॅरेटमध्ये 75% सोनं असतं. ही प्रणाली आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असल्यामुळे दागिन्यांमधील सोन्याचं प्रमाण अचूक समजण्यास मदत होते.
advertisement
5/9
चांदीसाठी 'टंच' आणि 'फाईननेस' म्हणजे काय?चांदीची शुद्धता सोन्यासारखी भागांमध्ये विभागण्याऐवजी थेट 'टक्केवारी'मध्ये सांगितली जाते. भारतात याला पारंपरिक भाषेत 'टंच' म्हणतात.99.9 टंच: म्हणजेच 99.9% शुद्ध चांदी.92.5 टंच (स्टर्लिंग सिल्वर): दागिने किंवा भांड्यांसाठी वापरली जाणारी चांदी, जिची शुद्धता 92.5% असते.
advertisement
6/9
कारण चांदी सोन्याच्या तुलनेत थोडी कडक आणि स्थिर असते. त्यामुळे तिची शुद्धता कॅरेटमध्ये न मोजता थेट आकड्यांमध्ये (उदा.999 किंवा 925 फाईननेस) सांगणं सोपं आणि सोयीचं पडतं. आजकाल BIS हॉलमार्किंग अंतर्गत 999 किंवा 925 अशीच मार्किंग वापरली जाते.
advertisement
7/9
3. चांदी 'किलो'मध्ये का विकली जाते?सोन्याची किंमत खूप जास्त असल्याने ते ग्रॅममध्ये मोजलं जातं, पण चांदीचा वापर केवळ दागिन्यांपुरता मर्यादित नाही. ती भांडी, नाणी, मूर्ती आणि मोठ्या प्रमाणावर औद्योगिक (Industrial) कारणांसाठी वापरली जाते.जेव्हा लोक चांदीत गुंतवणूक करतात, तेव्हा ती विटांच्या (Silver Bars) स्वरूपात असते. आशियाई बाजारपेठेत चांदी किलोमध्ये विकली जाते, कारण तिचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात.
advertisement
8/9
पाश्चात्य देशात चांदी 'ट्रॉय औंस' (Troy Ounce) मध्ये मोजली जाते. लंडन बुलियन मार्केट असोसिएशनच्या मानकांनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या दरांचे निर्धारण मोठ्या विटांच्या (साधारण 30 किलो) वजनावरून होतं. सोन्याच्या तुलनेत चांदी स्वस्त आणि जड असल्याने 'किलो' हे एकक तिच्या व्यापारासाठी अधिक सोयीचं ठरतं.
advertisement
9/9
थोडक्यात सांगायचे तर सोन्याचं 'कॅरेट' त्याच्या नाजूक स्वभावामुळे निर्माण झालेलं मोजमाप आहे, तर चांदीचा 'किलो' तिच्या व्यापक वापरामुळे आलेलं परिमाण आहे. पुढच्या वेळी ज्वेलर्सकडे गेल्यावर हे गणित लक्षात ठेवा, म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Silver : सोनं 'कॅरेट'मध्ये अन् चांदी 'किलो'मध्ये असं का मोजतात? किंमती धातूंच्या मोजमापाचा हा फंडा नक्की काय आहे?