TRENDING:

'हा' पदार्थ जेवणात आणा आणि आजारांना करा बायबाय, याचे इतके फायदे की तुम्ही कल्पनाही केली नसेल

Last Updated:
हा पदार्थ भारतसह आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये याचं उत्पादन होतं.
advertisement
1/7
'हा' पदार्थ जेवणात आणा आणि आजारांना करा बायबाय, फायदे इतके की कल्पनाही केली नसेल
बदलत्या जीवनशैलीत फिटनेस राखणं हे खूपच महत्त्वाचं काम आहे. स्थूलता, लठ्ठपणा, उच्च- रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळं लोकांना खूपच त्रास सहन करावा लागतो.
advertisement
2/7
यासगळ्या आजारापासून लांब राहण्यासाठी चांगला मार्ग म्हणजे चांगली झोप आणि चांगलं जेवण. यासाठी पारंपारिक तृणधान्यं आणि भरडधान्य (मिलेट) उपयोगाची आहेत, असं मत पुण्यातील या विषयाच्या अभ्यासक संगिता संजय कुमार यांनी दिलं आहे. त्यांनी याबाबत काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्यात.
advertisement
3/7
मिलेट म्हणजे काय? मिलेट हा प्राचीन धान्याचा एक प्रकार आहे. जो दोन प्रकारच्या धान्यांपासून बनविला जातो. अनेकांना मिलेट म्हंटलं की बाजरीची आठवण येते. हा मिलेटमधील सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. मिलेट हे भारतसह आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये याचं उत्पादन होतं.
advertisement
4/7
बाजरीचे धान्य रक्तदाब कमी करू शकते आणि गॅस्ट्रिक अल्सर आणि पोटाचा कर्करोग टाळू शकते. बाजरी बद्धकोष्ठता, सूज आणि लठ्ठपणा कमी करण्यास देखील मदत करू शकते. मिलेट हे एक पौष्टिक पीक आहे, डोंगराळ, किनारी, पावसावर अवलंबून आणि कोरड्या भागात त्याचे उत्पादन घेता येते.
advertisement
5/7
जमिनीची मर्यादित सुपीकता किंवा वनस्पतींची वाढ टिकवून ठेवण्याची मातीची क्षमता आणि जमिनीतील ओलाव्याची श्रेणी लक्षात घेऊन ही धान्ये त्यात सहज उगवतात. ज्यात भरड आणि सूक्ष्म धान्यांचा समावेश केला जातो.
advertisement
6/7
बाजरीसह नाचणी, बाजरी, झांगोरा, ज्वारी, कोडो, बेरी, चेना, कांगणी, कुटकी, मूग, इतर धान्यांचाही मिलेटमध्ये समावेश होतो, अशी माहिती संगिता यांनी दिली. मिलेट्सचे मुख्य प्रकार कोडो मिलेट्स हा एक महत्तावाचा औषधी पदार्थ आहे. हे अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्त्रोत आहे.
advertisement
7/7
लहान मिलेट, ज्याला मराठीमध्ये “सवा, वरी किंवा हलवी” देखील म्हणतात, हा एक प्रकारचा लहान-बिया असलेला मिलेटचा प्रकार आहे. या मिलेट्सचे दाणे हलके पिवळसर रंगाचे लहान आणि गोल असतात. ते अत्यंत पौष्टिक आणि ग्लूटेन-मुक्त असतात. ते भातासारखेच शिजवता येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
'हा' पदार्थ जेवणात आणा आणि आजारांना करा बायबाय, याचे इतके फायदे की तुम्ही कल्पनाही केली नसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल