TRENDING:

लिटल लिटलही जीवावर बेतेल! दारूबाबत मुंबईच्या टाटा इन्स्टिट्युटचा धक्कादायक रिपोर्ट; थर्टी फर्स्ट पार्टीआधी वाचाच

Last Updated:
Alcohol Cancer Study : थर्टी फर्स्ट पार्टीला अनेकांनी दारू पिण्याचा बेत आखला असेल. काही जण तर पहिल्यांदाच ट्राय करण्याच्या विचारात असतील. पण याचदरम्यान दारूबाबत मुंबईच्या टाटा इन्स्टिट्युटचा धक्कादायक रिपोर्ट आला आहे. जो प्रत्येकाने वाचायला हवा.
advertisement
1/7
लिटल लिटल घेताय! दारूबाबत टाटाचा धक्कादायक रिपोर्ट; थर्टी फर्स्ट पार्टीआधी वाचाच
25 डिसेंबर आज ख्रिसमस आणि 31 डिसेंबरला थर्टी फर्स्ट पार्टी म्हणजे दारू आलीच. पण यादरम्यान मुंबईच्या टाटा इन्टिट्युटचा दारूबाबत धक्कादायक रिपोर्ट आला आहे. थोडी दारू जरी घेतली तरी कॅन्सरचा धोका वाढतो असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
advertisement
2/7
खारघर येथील अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन करिअर्स (एसीटीआरएसी) ने अल्कोहोलचं नुकसान समजून घेण्यासाठी हे संशोधन केलं. हा अभ्यास प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल बीएमजे ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झाला आहे. अभ्यासात 1803 तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आणि 1903 निरोगी व्यक्तींचा समावेश होता.
advertisement
3/7
भारताचा जगातील आघाडीच्या कर्करोगाच्या जोखीम गटांमध्ये समावेश आहे. भारतात पुरुषांमध्ये तोंडाचा कर्करोग सर्वात जास्त आढळतो. संशोधनानुसार, भारतातील दर 1 लाख पुरुषांपैकी सरासरी 15 पेक्षा जास्त पुरुषांना दरवर्षी तोंडाचा कर्करोग होतो. काही शहरांमध्ये हा दर 30 पेक्षा जास्त आहे.
advertisement
4/7
सर्व प्रकारच्या अल्कोहोलच्या परिणामांचं मूल्यांकन करण्यात आलं. कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल प्यायल्याने तोंडाच्या कर्करोगाचा धोका  दुप्पट होतो. देशी मद्य प्यायल्याने धोका तीन ते पाच पट वाढतो.
advertisement
5/7
अल्कोहोलचं सेवन दररोज ग्रॅममध्ये मोजलं गेलं. संशोधनानुसार, दररोज 9 ग्रॅमपेक्षा कमी अल्कोहोल प्यायल्याने कर्करोगाचा धोका 56% वाढतो. दिवसातून एक पेय देखील धोका वाढवतं, म्हणजेच अल्कोहोल सेवनासाठी कोणतीही सुरक्षित मर्यादा नाही.
advertisement
6/7
अल्कोहोलला ग्रुप-1 कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत केलं आहे आणि ते फक्त तोंडाच्या कर्करोगासाठीच नाही तर इतर सात प्रकारच्या कर्करोगासाठीदेखील जबाबदार आहे.
advertisement
7/7
अल्कोहोलचे रूपांतर एसीटाल्डिहाइड नावाच्या रसायनात होतं, जे डीएनएला नुकसान पोहोचवतं. हेच कर्करोगाचं कारण आहे.  भारतातील बहुतेक लोकांमध्ये असे जीन्स आहेत जे अल्कोहोल हळूहळू विघटित करतात. यामुळे एसीटाल्डिहाइड शरीरात जास्त काळ टिकून राहतं आणि कर्करोगाचा धोका वाढवतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
लिटल लिटलही जीवावर बेतेल! दारूबाबत मुंबईच्या टाटा इन्स्टिट्युटचा धक्कादायक रिपोर्ट; थर्टी फर्स्ट पार्टीआधी वाचाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल