गर्भधारणेसाठी IVF उपचार घेताय? त्याआधी डॉक्टरांनी दिलेले खास सल्ले पाहाच, अन्यथा होईल पश्चात्ताप
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
IVF साठी शारीरिक आणि मानसिक तयारी कशी करावी? टप्प्याटप्प्याने संपूर्ण मार्गदर्शन आणि सोप्या टिप्स
advertisement
1/10

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक जोडप्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणेसाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत IVF म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन प्रक्रिया अशा जोडप्यांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे. मात्र IVF प्रक्रियेत यश मिळवण्यासाठी फक्त वैद्यकीय उपचार पुरेसं नाही, तर शारीरिक आणि मानसिक तयारी देखील तितकीच महत्त्वाची आहे.
advertisement
2/10
IVF प्रक्रिया करण्याआधी आणि प्रक्रिया करत असताना कोणकोणती काळजी घ्यायला हवी याबाबत अनेक जोडप्यांच्या मनात संभ्रम असतो. मात्र, काही गोष्टींचे पालन केल्यास या प्रक्रियेतून अपेक्षित परिणाम मिळू शकतात.
advertisement
3/10
संतुलित आणि पोषणमूल्यपूर्ण आहार : IVF साठी शरीराचं पोषण योग्य असणं फार गरजेचं आहे. आहारात प्रोटीन, फायबर, आयर्न, आणि फॉलिक ॲसिड भरपूर असणाऱ्या गोष्टींचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या, फळं, अंडी, नट्स, आणि दूध यांचा आहारात समावेश करावा. प्रोसेस्ड फूड्स, जास्त साखर आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ टाळावेत. भरपूर पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेटेड ठेवावे.
advertisement
4/10
वजनावर नियंत्रण ठेवणे : IVF प्रक्रियेच्या वेळी वजन खूप जास्त किंवा खूप कमी असल्यास गर्भधारणेची शक्यता कमी होते. तुम्हालाही वजनाशी संबंधीत काही समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य व्यायाम प्रकार निवडावेत. योगासने, चालणे, हलकी कार्डिओ व्यायाम करावेत.
advertisement
5/10
मानसिक तयारी आणि स्ट्रेस मॅनेजमेंट : IVF प्रक्रियेमध्ये मानसिक तणाव खूप वाढू शकतो. म्हणूनच, स्ट्रेस मॅनेजमेंट तंत्र शिकणं अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ध्यानधारणा (Meditation), योगा किंवा डीप ब्रीदिंग एक्सरसाइज यांचा नियमित सराव करावा.
advertisement
6/10
नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी सकारात्मक पुस्तकं वाचा किंवा थेरपीचा पर्याय निवडा. इतकंच नाही, तर आपल्या जोडीदाराशी सतत मोकळं आणि प्रामाणिक संवाद साधा.
advertisement
7/10
डॉक्टरांच्या चाचण्या आणि तपासण्या वेळेवर पूर्ण करा : IVF सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक चाचण्या, जसे की रक्ततपासणी, हार्मोन प्रोफाइल, सोनोग्राफी वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करा. कोणती औषधे घ्यायची, कोणती टाळायची याबद्दल सविस्तर माहिती घ्या.
advertisement
8/10
वाईट सवयी त्वरित सोडा : धूम्रपान, मद्यपान यांचा प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही या सवयींपासून दूर राहिलात तर IVF चं यश प्रमाण वाढू शकतं.
advertisement
9/10
झोपेची काळजी घ्या : दररोज किमान ७ ते ८ तासांची शांत झोप आवश्यक आहे. झोपेची नियमित वेळ ठरवा. झोपेसाठी मोबाईल, लॅपटॉपपासून थोडं दूर राहणं फायदेशीर ठरेल.
advertisement
10/10
IVF ही एक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खडतर प्रक्रिया असली तरी योग्य तयारीने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही या प्रवासात यश मिळवू शकता. आपल्या शरीरावर विश्वास ठेवा, तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निर्णय घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
गर्भधारणेसाठी IVF उपचार घेताय? त्याआधी डॉक्टरांनी दिलेले खास सल्ले पाहाच, अन्यथा होईल पश्चात्ताप