स्वयंपाकघरातले 'हे' पदार्थ वाढवतात रोगप्रतिकारशक्ती, आजारांपासून मिळते मुक्ती!
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
मागील काही दिवसांपासून थंडी पडायला सुरूवात झाली, त्यातच काल अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आता वातावरणात आणखी गारवा निर्माण झालाय. थंडीत लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना साथीच्या आजारांचा धोका जास्त असतो. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.
advertisement
1/5

झारखंडच्या बोकारो भागातील वरिष्ठ आयुर्वेदिक डाॅक्टर राजेश कुमार पाठक यांनी थंडीत काही घरगुती रामबाण उपाय सांगितले. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या अनेक पदार्थांपासून आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो, असं ते म्हणाले.
advertisement
2/5
हळद, जिरं, लवंग आणि काळीमीरी एकत्र बारीक पिसून घ्यावी. वयस्कर व्यक्तींनी सकाळी एक चमच आणि संध्याकाळी चमचाभर अशी ही पावडर घ्यावी.
advertisement
3/5
लहान मुलांनी मध आणि तूप मिसळून ही पावडर घ्यावी. त्यामुळे त्यामुळे त्यांचं शरीर सुदृढ राहील आणि हिवाळ्यातील साथीच्या आजारांपासून संरक्षण होईल. मधात अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात.
advertisement
4/5
रात्री हळदीचं दूध प्यायल्यास अत्यंत फायदेशीर ठरेल. हळदीत अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
advertisement
5/5
मध गरम पाण्यात घेतल्यास ताप, सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो. शिवाय घश्याची खवखवही बरी होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
स्वयंपाकघरातले 'हे' पदार्थ वाढवतात रोगप्रतिकारशक्ती, आजारांपासून मिळते मुक्ती!