TRENDING:

Solapur News: घरात कुणी नव्हतं, जावा-जावांचं बिनसलं, बार्शीत भयंकर घडलं, आता जन्माची अद्दल!

Last Updated:

Solapur news: दागिने कपाटातून गायब झाल्याची बाब उज्वलाच्या लक्षात आली होती. याबाबत तिने जाऊ गीता हिच्याकडे वारंवार चौकशी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर - ज्या घरात आनंदाने गृहप्रवेश केला, त्याच घरात अवघ्या दोन महिन्यांत एका नवविवाहितेचा करुण अंत झाला. दागिने चोरीचा संशय व्यक्त केल्याच्या रागातून जावेनेच आपल्या धाकट्या जावेचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिला पेटवून दिले. या धक्कादायक घटनेत बार्शी सत्र न्यायालयाने आरोपी जाऊ गीता शंकर पाडोळे हिला जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे.
Solapur News: घरात कुणी नव्हतं, जावा-जावांचं बिनसलं, सोलापुरात भयंकर घडलं, आता जन्माची अद्दल!
Solapur News: घरात कुणी नव्हतं, जावा-जावांचं बिनसलं, सोलापुरात भयंकर घडलं, आता जन्माची अद्दल!
advertisement

उज्ज्वला किरण पाडोळे (राहणार अंजनगाव) हिचे लग्न 29 नोव्हेंबर 2022 रोजी झाले होते. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत 2 फेब्रुवारी 2023 रोजी तिचा संशयास्पद मृत्यू झाला. लग्नात मिळालेले सोन्याचे दागिने कपाटातून गायब झाल्याची बाब उज्ज्वलाच्या लक्षात आली होती. याबाबत तिने जाऊ गीता हिच्याकडे वारंवार चौकशी केली. याच वादातून आरोपीने घरात कोणी नसताना उज्ज्वलाचा गळा दाबून खून केला आणि ती जळाली असल्याचे भासवण्यासाठी मृतदेहाला आग लावल्याचा आरोप होता.

advertisement

सोलापूर हादरलं! मध्यरात्री भयंकर घडलं, मित्रानंच मित्राला संपवलं, मोबाईल ठरला कारण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

मृत उज्ज्वला हिचे वडील सिद्धेश्वर जाधव यांनी माढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. खटल्यादरम्यान शवविच्छेदन करणारे डॉ. सदानंद व्हनकळस यांनी दिलेल्या वैद्यकीय साक्षीला महत्त्व प्राप्त झाले. प्रत्यक्ष साक्षीदार नसतानाही परिस्थितीजन्य व वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे न्यायाधीशांनी आरोपीला खुनाबद्दल जन्मठेप व 5 हजार रुपये दंड, तसेच पुरावा नष्ट केल्याबद्दल 3 वर्षे कारावास व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Solapur News: घरात कुणी नव्हतं, जावा-जावांचं बिनसलं, बार्शीत भयंकर घडलं, आता जन्माची अद्दल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल