TRENDING:

Honeymoon Murder : सोनमपेक्षाही 'शातिर' निघाली अंजू; लग्नाच्या 3 महिन्यात हनिमून अन् नवऱ्याचा अपघात; पण एका गोष्टीनं समोर आला खरा चेहरा

Last Updated:
Honeymoon Murder : सुरुवातीला हा एक साधा 'हिट अँड रन'चा अपघात वाटत होता, पण जसजसा तपास पुढे सरकला, तसतसे या लग्नाच्या पडद्यामागील भयानक वास्तव समोर आले. एका नवविवाहित पत्नीने आपल्याच पतीचा काटा काढण्यासाठी रचलेला हा कट ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
advertisement
1/7
लग्न, हनिमून, मग नवऱ्याचा अपघात आणि… सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली अंजू
लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन, विश्वासाचं नातं आणि सुखी संसाराची स्वप्नं. नवीन लग्न झालेलं जोडपं जेव्हा फिरायला बाहेर पडता, ते हनिमूनला जातात, तेव्हा त्यांच्यात नवीन नातं फुलत असतं, भविष्यातील स्वप्न रंगत असतात, काही प्लानिंग्स होत असतात. पण जर हेच क्षण एका जोडीदारासाठी मृत्यूचा सापळा ठरणार असेल तर? राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये घडलेली एक घटना सध्या संपूर्ण देशाला सुन्न करून सोडत आहे. सुरुवातीला हा एक साधा 'हिट अँड रन'चा अपघात वाटत होता, पण जसजसा तपास पुढे सरकला, तसतसे या लग्नाच्या पडद्यामागील भयानक वास्तव समोर आले. एका नवविवाहित पत्नीने आपल्याच पतीचा काटा काढण्यासाठी रचलेला हा कट ऐकून पोलिसांचेही डोळे विस्फारले आहेत.
advertisement
2/7
30 जानेवारीची 'ती' काळरात्रराजस्थानमधील श्रीगंगानगरचे पोलीस अधीक्षक अमृता दुहान यांना 30 जानेवारीच्या रात्री 9 च्या सुमारास माहिती मिळाली की, रस्त्यावर एक तरुण जोडपं बेशुद्ध अवस्थेत पडलं आहे. आशिष आणि अंजू असं या जोडप्याचं नाव होतं. पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र दुर्दैवाने आशिषला मृत घोषित करण्यात आले. अंजू मात्र बचावली होती.
advertisement
3/7
23 वर्षीय अंजूने पोलिसांना सांगितले की, ती आणि आशिष फिरायला गेले असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. इतकंच नाही, तर ती बेशुद्ध पडल्यानंतर कुणीतरी तिचे दागिनेही लुटून नेल्याचा दावा तिने केला. वरवर पाहता हे प्रकरण अपघाताचे आणि चोरीचे वाटत होते, पण पोलिसांना मात्र काहीतरी गडबड वाटत होती.
advertisement
4/7
पोलिसांना संशय कुठे आला?तपासादरम्यान पोलिसांना अंजूनं सांगितलेल्या कहानीत थोडी विसंगती आढळली.1. जखमांच्या खुणा: अपघातात शरीराला ज्या प्रकारच्या जखमा होतात, त्याऐवजी आशिषच्या शरीरावर गळा आवळल्याच्या खुणा होत्या.2. अंजूचा पवित्रा: आशिषचा जागीच मृत्यू झाला असताना, अंजूला मात्र साधं खरचंटलंही नाही, हे कसं शक्य आहे?3.अंजू पोलिसांना प्रत्येक वेळी वेगळी माहिती देत होती, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
advertisement
5/7
मेघालयातील 'त्या' खुनाची आठवणया प्रकरणाने गेल्या वर्षीच्या सोनम रघुवंशी केसची आठवण करून दिली. सोनमनेही आपल्या पतीचा, राजाचा हनिमूनवर खून करून तो अपघात असल्याचा बनाव रचला होता. राजस्थानची ही अंजू देखील सोनमच्याच पावलावर पाऊल ठेवून चालली होती, किंबहुना ती तिच्यापेक्षाही 'शातिर' निघाली. पण तरीही तिचा प्लान फसलाच.
advertisement
6/7
प्रियकरासोबत मिळून रचला मृत्यूचा सापळापोलिसांनी जेव्हा अंजूचे कॉल रेकॉर्ड तपासले, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. अंजूचं तिच्या घराशेजारी राहणाऱ्या संजू नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. तीन महिन्यांपूर्वी आशिषशी लग्न झाल्यानंतरही अंजू खूश नव्हती. ती माहेरी गेल्यावर तिने संजूशी पुन्हा जवळीक साधली आणि आशिषला संपवण्याचा कट रचला.
advertisement
7/7
30 जानेवारीच्या रात्री अंजूने आशिषला एका निर्जन रस्त्यावर फिरायला नेले. तिथे आधीच संजू आणि त्याचे साथीदार - रॉकी (रोहित) आणि बादल (सिद्धार्थ) झाडाझुडपात लपून बसले होते. त्यांनी आशिषवर हल्ला केला, त्याचा गळा आवळला आणि नंतर तो अपघात वाटावा म्हणून गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अंजू, तिचा प्रियकर संजू आणि इतर दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ज्या पत्नीने आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली होती, तिनेच लग्नाच्या अवघ्या 90 दिवसांत आपल्या पतीचा गेम केल्याने परिसरात संतापाची लाट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/क्राइम/
Honeymoon Murder : सोनमपेक्षाही 'शातिर' निघाली अंजू; लग्नाच्या 3 महिन्यात हनिमून अन् नवऱ्याचा अपघात; पण एका गोष्टीनं समोर आला खरा चेहरा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल