Bigg Boss फेम मराठमोळ्या अभिनेत्रीनं केलं गुपचूप लग्न? 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत PHOTO व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस फेम मराठमोळ्या अभिनेत्रीनं गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा सुरू आहेत. एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
advertisement
1/10

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे सर्वात लोकप्रिय टीव्ही स्टार्सपैकी आहेत. त्यांची भेट सलमान खानच्या 'बिग बॉस' या रिॲलिटी शोमध्ये झाली होती. घरातून बाहेर पडल्यानंतरही त्यांचे नाते पुढे चालू राहिले आणि दोघांनी सीक्रेट लग्न केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. त्यांचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
2/10
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची भेट बिग बॉस 15 मध्ये झाली होती. शो दरम्यान ते एकमेकांच्या जवळ आले. बिग बॉसचा प्रवास संपल्यानंतरही त्यांचं नातं पुढे चालू राहिलं. ते जवळपास पाच वर्षांपासून एकत्र आहेत.
advertisement
3/10
सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये दावा केला जात आहे की करण आणि तेजस्वीने गुपचूप लग्न केलं आहे. दोघांनी कुटुंबाच्या उपस्थितीत एका खाजगी समारंभात लग्नगाठ बांधली. या पोस्टमध्ये एका युझरनं तेजस्वी आणि करणचं अभिनंदन केले आहे. दरम्यान या पोस्टला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
advertisement
4/10
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी त्यांच्या लग्नाच्या या अफवांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या पोस्टमुळे दोघांनी लग्न केलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सुरू होत्या.
advertisement
5/10
करण आणि तेजस्वी गेल्या पाच वर्षांपासून एकत्र आहेत. बिग बॉस 15 च्या घरात सुरू झालेली त्यांची मैत्री हळूहळू एका घनिष्ठ नात्यात बदलली. शो दरम्यानची त्यांची केमिस्ट्री त्या सीझनमधील सर्वाधिक चर्चित विषयांपैकी एक बनली होती. दोघे सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले.
advertisement
6/10
ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, सुट्ट्यांमध्ये आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये एकत्र दिसू लागले. कालांतराने, 'तेजरान' हा हॅशटॅग त्यांनी बनवला आणि दोघांना तेजरान म्हणून सगळे ओळखू लागले.
advertisement
7/10
या जोडप्याच्या नात्यात अनेक चढ-उतार आले आहेत. त्यांच्या ब्रेकअपच्या अफवांनाही जोर चढला. गेल्या वर्षी, करण कुंद्रा त्याची गर्लफ्रेंड तेजस्वीसोबत तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसला नव्हता ज्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या अफवा पसरल्या.
advertisement
8/10
त्यांच्या ब्रेकअपच्या अफवांवर प्रतिक्रिया देताना करण कुंद्रा म्हणाला की, लोक 'वास्तव' न जाणता अंदाज बांधतात. तो असेही म्हणाला की, त्यांचे नाते सोशल मीडियावर दिसते त्यापेक्षा खूपच सामान्य आहे. अभिनेत्याने स्पष्ट केले की मतभेद नैसर्गिक आहेत पण याचा अर्थ ब्रेकअप होत नाही.
advertisement
9/10
तेजस्वीनेही हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ब्रेकअपच्या अफवा फेटाळून लावल्या आणि सांगितले की तिला त्या गमतीशीर वाटतात. अभिनेत्री म्हणाली, "मला माहित आहे की माझ्या वैयक्तिक आयुष्यावर खूप लक्ष केंद्रित केले जाते, पण मला वाटत नाही की तेच एकमेव लक्ष असले पाहिजे. आमचे चाहते स्वतःचे मनोरंजन करतात आणि ते ठीक आहे. आम्हाला ते गमतीशीर वाटते आम्ही त्यावर हसतो."
advertisement
10/10
करण कुंद्रा आणि तेजस्वी 'लाफ्टर शेफ' या शोमध्ये एकत्र दिसतात. या शोचे सूत्रसंचालन भारती सिंग करते आणि यामध्ये अंकिता लोखंडे, अर्जुन बिजलानी, निया शर्मा, सुदेश लेहरी आणि अली गोनी यांच्यासह इतर सेलिब्रिटींचाही समावेश आहे. हा शो कलर्स टीव्ही आणि जिओहॉटस्टारवर टेलिकास्ट होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss फेम मराठमोळ्या अभिनेत्रीनं केलं गुपचूप लग्न? 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत PHOTO व्हायरल