TRENDING:

आता सीक्रेट लपवू शकत नाही! केतकी माटेगावकरने सांगितली तिच्या आयुष्यातली खास गोष्ट

Last Updated:
Ketaki Mategaonkar : अभिनेत्री आणि गायिका असलेल्या केतकी माटेगावरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यात तिने तिच्या आयुष्यातील खास सीक्रेटबाबत सांगितलं आहे.
advertisement
1/7
आता सीक्रेट लपवू शकत नाही! केतकी माटेगावकरने सांगितली तिच्या आयुष्यातली खास गोष्ट
अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर, जिला कित्येक जण प्राजू म्हणून ओळखतात. तिची टाइमपास फिल्ममधील प्राजक्ता म्हणजे प्राजूची भूमिका आजही तिच्या चाहत्यांच्या लक्षात आहे. केतकीने यानंतर शाळा फिल्ममध्येही काम केलं. ज्यात तिने शिरोडकरचं पात्र केलं.
advertisement
2/7
केतकीसोबत टाइमपासमध्ये दिसलेला दगडू म्हणजे अभिनेता प्रथमेश परब आणि शाळा फिल्ममधील मुकुंद जोशी म्हणजे अभिनेता अंशुमन जोशी दोघांचंही लग्न झालं आहे. आता केतकीच्या लग्नाचीही तिच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
advertisement
3/7
याचदरम्यान केतकीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे. केतकीने आपल्या आयुष्यातील एक खास असं एक सीक्रेट असून, ते आता आपण जास्त काळ लपवू शकत नाही असं सांगितलं.
advertisement
4/7
केतकीने पोस्टमध्ये म्हटलं आहे, "तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी नवीन. उत्साह खूप आहे. आणखी जास्त वेळ सीक्रेट लपवून ठेवू शकत नाही"
advertisement
5/7
केतकीने आपले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसते आहे. पण ही साडी खास आहे, म्हणजे सामान्य पद्धतीने नेसली जाते तशी ही साडी नाही. तर ऑनस्क्रिन तुम्ही देवी किंवा नागिणच्या पात्राला अशा रूपात पाहिलं आहे.
advertisement
6/7
आपल्या या आऊटफिटबाबत सांगताना केतकी म्हणते, "माझ्या आयुष्यातील खास गोष्ट, ज्याच्या शूटिंगसाठी अर्थातच मला पांढरं घालावं लागलं" आश्चर्य म्हणजे केतकीचं हे आऊटफिट आणि लूक तिने स्वत: डिझाइन केला आहे. आपलं हे साइड पॅशन असल्याचंही तिने सांगितलं.
advertisement
7/7
या लूकवरून आणि पोस्टवरून केतकी काहीतरी नवीन करते आहे हे समजतं. आता ते नक्की काय? केतकीचा हा लूक नेमका कशासाठी? अशा प्रश्न कित्येकांना पडला असेल. आपण याबाबत आपल्या युट्युब चॅनेलवर सांगणार असल्याचं केतकीने सांगितलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आता सीक्रेट लपवू शकत नाही! केतकी माटेगावकरने सांगितली तिच्या आयुष्यातली खास गोष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल